बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या डॉक्टरला तुरुंगाची हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:33 AM2023-01-05T07:33:16+5:302023-01-05T07:33:47+5:30
कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना चुकीचे आरोग्य प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल तिला दोषी ठरविण्यात आले आहे, ज्यापैकी बहुतेकांना ती कधीही भेटली नव्हती किंवा त्यांची तपासणी केली नव्हती.
बर्लिन : जर्मन महिला डॉक्टरने मास्कपासून सूट मिळावी म्हणून ४ हजार बनावट प्रमाणपत्रे वाटप केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असून दोन वर्षे नऊ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिमी शहरातील हाइम मधील प्रादेशिक न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.
कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना चुकीचे आरोग्य प्रमाणपत्र जारी केल्याबद्दल तिला दोषी ठरविण्यात आले आहे, ज्यापैकी बहुतेकांना ती कधीही भेटली नव्हती किंवा त्यांची तपासणी केली नव्हती. तुरुंगवासाच्या शिक्षेव्यतिरिक्त, तिच्या कामावर तीन वर्षांची बंदी घातली गेली आणि तिला वैद्यकीय प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी मिळालेली रक्कम १८ हजार युरो इतकाच दंड सुनावण्यात आला. तिच्या पीएला २७०० युरो दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे खटल्यादरम्यान ही या डॉक्टर महिलेने मास्क घालणे हे लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा केला होता.