तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:04 PM2020-07-30T19:04:55+5:302020-07-30T19:07:45+5:30
नारपोली पोलिसांकडून घरफोडीच्या दोन घटनांची उकल
भिवंडी - मित्रांच्या मदतीने मुलीने स्वतःच्या घरीच तेरा लाखांची घरफोडी केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बुधवारी नारपोली पोलिसांनी घेतलेल्या घरफोडी प्रकरणातील गुन्ह्यांच्या उकल केल्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅचलॉक बनावट चावीने उघडून घरातील कपाटासह किचनमध्ये पत्र्याच्या पेटित पिशवीत बांधून ठेवलेले 13 लाख 21 हजार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी घरमालक सुवर्णा सोनगीरकर या महिलेने 22 जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला प्रियकरासह धुळ्यातून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे ,सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर,नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने धुळे येथून याप्रकरणात दोन जणांना अटक केली आहे. मात्र चोरट्यांना अटक केल्या नंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी या घरफोडीच्या गुन्ह्यात घरातील माहितगार असू शकतो या दिशेने तपास सुरु केला होता. त्यानुषंगाने फिर्यादी सुवर्णा सोनगीरकर यांच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीकडे या विषयी अधिक चौकशी केली असता तिच्या बोलण्यातील विसंगती लक्षात आल्यावर तिच्या कडे अधिक तपास केला असता तिने आपल्या प्रियकर मित्रा सोबत कट रचून ही घरफोडी घडवून आणत भविष्यात प्रेम विवाह करण्याच्या अनुषंगाने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर तपास पथकाने धुळे येथून प्रतीक तुषार लाळे (माने ) वय 21 व हेमंत दिलीप सौन्दाणे वय 21 दोघे रा.देवपूर धुळे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 55 हजार रोख व 8 लाख 96 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेतील आरोपींमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी लवकरच या मुलीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती नारपोली पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या कारवाईत पोलीस उप निरीक्षक राहुल व्हरकाटे ,पोहवा सोनावणे, सातपुते ,पोना सोनगीरे , पो शि बंडगर ,शिरसाठ ,ताटे या पथकाने विशेष परिश्रम घेतले.
तर दुसऱ्या घटनेत 9 जुलै रोजी ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील ब्ल्यू लाईन लॉजीस्टिक अँड वेअर हाऊसिंग एलएलपी कंपनीच्या गोदामांचे छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी गोदामातील मायक्रोमॅक्स मोबाईल ,लॅपटॉप ,हेडफोन, पॉवर बँक ,टॅब असा 11 लाख 95 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल चोरी केली असता पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे ,सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो निरी मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप निरी पुष्पराज सुर्वे ,पोहवा बोडके ,पोना सहारे, पो शि सोनावणे ,बाविस्कर,शिंदे, गलांडे, महिला पो शि मनीषा शिंदे या पथकाने बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाच्या साहाय्याने कामण चिंचोटी येथून आलम मंटू शेख या मूळ रा.झारखंड यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याच्या कडून 6 लॅपटॉप,146 मोबाईल,8 ब्ल्यूटूथ हेडफोन,5 टॅबलेट असा 8 लाख 34 हजार 644 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील अजून दोन आरोपी झारखंड येथून ताब्यात घ्यावयाचे असून हा चोरीचा मुद्देमाल आरोपी उत्तर भारतात व नेपाळ या ठिकाणी विक्री करणार असल्याची माहिती राजकुमार शिंदे यांनी दिली असून अटक आरोपी हा सराईत मोक्कामधील गुन्हेगार असून त्यावर मुंबई ,ठाणे ,कल्याण येथे सुध्दा घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी दिली. या दोन्ही घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करीत एकूण तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कडून तब्बल 17 लाख रुपयांचा मुद्देमाल ज्या मध्ये लॅपटॉप ,मोबाईल , टॅबलेट व सोन्याचे दागिने रोख रक्कम यांचा समावेश आहे अशी माहिती भिवंडी परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत दिली असून या यशस्वी कामगिरी बद्दल पोलीस पथकाचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी विशेष सन्मान केला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू
Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न