बापाचे दुष्कृत्य! डॉक्टर वडिलाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर केली होती मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:58 AM2020-06-20T11:58:05+5:302020-06-20T12:00:34+5:30

डॉक्टर आणि त्याच्या भावाला पोलिसांनी गुरुवारी कोर्टात हजर केले, तेथून दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

The doctor's father raped his daughter, who was beaten after oppose | बापाचे दुष्कृत्य! डॉक्टर वडिलाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर केली होती मारहाण 

बापाचे दुष्कृत्य! डॉक्टर वडिलाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर केली होती मारहाण 

Next
ठळक मुद्देभोटिया पडव भागातील रुग्णालयाच्या मालकाचे वाराणसी येथील महिला डॉक्टरशी लग्न झाले होते. डॉक्टरांना सात वर्षाची मुलगी आहे.दोघांवरही पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 323, 506, 376 (2) डी -5 एमएनजी -6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका वर्षाच्या तपासणीनंतर उत्तराखंडच्या हल्द्वानी कोतवाली पोलिसांनीबलात्काराच्या आरोपाखाली डॉक्टर आणि त्याच्या भावाला अटक केली. डॉक्टरच्या पत्नीने डॉक्टरने त्याच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असल्याचा आरोप केला होता. डॉक्टर आणि त्याच्या भावाला पोलिसांनी गुरुवारी कोर्टात हजर केले, तेथून दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोटिया पडव भागातील रुग्णालयाच्या मालकाचे वाराणसी येथील महिला डॉक्टरशी लग्न झाले होते. डॉक्टरांना सात वर्षाची मुलगी आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिला डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी डॉक्टरांनी मुलीला वाराणसीहून आणले होते. या काळात डॉक्टराने मुलीवर बलात्कार केला. ही घटना 23 मार्च 2018 रोजीची असल्याचे समजते.


डॉक्टरच्या भावानेही या दुष्कर्मास साथ दिली होती. मुलीने विरोध केल्यानंतर डॉक्टराने मुलीलाही मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरच्या पत्नीने वाराणसीच्या लंका पोलिस स्टेशनमध्ये पती आणि भावाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.


हा गुन्हा वाराणसीहून हल्द्वानी कोतवाली येथे पाठविण्यात आला. कोतवालीच्या उपनिरीक्षक गुरविंदर कौर यांनी 6 सप्टेंबर 2019 पासून या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान, जबाब घेण्यासाठी पोलीस अनेक वेळा वाराणसीलाही गेले होते. कोतवाल संजय कुमार म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्या भावाला घरातून अटक केली आहे. दोघांवरही पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 323, 506, 376 (2) डी -5 एमएनजी -6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

कुटुंबाचा विरोध असताना लग्न केले, सख्ख्या भावाने बहिणीसह तिच्या पतीची चाकूने सपासप वार करून केली हत्या 

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक 

Web Title: The doctor's father raped his daughter, who was beaten after oppose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.