सुशांतची अॅटॉप्सी करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 20:39 IST2020-08-22T20:36:38+5:302020-08-22T20:39:26+5:30
Sushant Singh Rajput Suicide : शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतची अॅटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली.

सुशांतची अॅटॉप्सी करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला खळबळजनक खुलासा
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पोस्टमॉर्टेम केलेल्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. सीबीआय चौकशीत सुशांतची अटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुंबईपोलिसांनी त्यांना लवकरच पोस्टमार्टम करण्यास सांगितले होते. शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतची अॅटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली.
अॅटॉप्सीच्या अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्या
सुशांत प्रकरणात मुंबई गाठलेली सीबीआयची टीम शनिवारी दुसर्या दिवशी चौकशीत व्यस्त आहे. सीबीआयला सुशांतचा पोस्टमॉर्टेम अहवाल शुक्रवारी दुपारीच मिळाला, त्यानंतर शनिवारी एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयात 5 डॉक्टरांकडून चौकशी केली गेली आहे. अॅटॉप्सी अहवालात अनेक प्रकारचे त्रुटी समोर आल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी केला घाईघाईत पोस्टमॉर्टेम
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, जेव्हा सीबीआयच्या पथकाने डॉक्टरांची सुशांतची अॅटॉप्सी करण्यात इतकी घाई का केली आहे असे विचारले तेव्हा एका डॉक्टरने सांगितले की, त्यांना मुंबई पोलिसांना तसे करण्यास सांगितले आहे. 14 जून रोजी सकाळी सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंखावर लटकलेला आढळला, त्यानंतर 14 जूनच्या रात्री सुशांतचा पोस्टमॉर्टेम करण्यात आला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?