SUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? गुजरात पोलिसांचा आरटीओला लाजीरवाणा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 02:55 PM2021-05-09T14:55:29+5:302021-05-09T15:16:36+5:30

Rape in SUV: एक तरुणी तिच्यावर एका नराधमाने त्याच्या एसयुव्हीमध्ये बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार घेऊन गेली होती. त्याची चौकशी करायची सोडून पोलिसांना विचित्रच प्रश्न पडला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही एसयुव्ही एका बड्या पुढाऱ्याची आहे. भद्र पटेल असे त्याचे नाव असून तो भाजी मंडई महामंडळाचा माजी अध्यक्ष होता. त्याची गुन्ह्याची मोठी पार्श्वभूमी आहे. 

Does the SUV have enough space to rape? Gujarat Police's embarrassing question to RTO | SUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? गुजरात पोलिसांचा आरटीओला लाजीरवाणा प्रश्न

SUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? गुजरात पोलिसांचा आरटीओला लाजीरवाणा प्रश्न

googlenewsNext

Gujrat Pollice horrible Question on Rape: एखाद्या मुलीसोबत किंवा महिलेवर बलात्कारासारखी घटना घडते आणि त्यावर पोलिसांना (Police) नको नको ते प्रश्न सुचतात. पीडितेला तिच्या यातनांपेक्षा याच गोष्टींचा जास्त त्रास होत असतो. असाच एक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. पीडितेवर एसयुव्हीमध्ये कसा बलात्कार (Rape in SUV) होऊ शकतो असा प्रश्न गुजरातच्यापोलिसांना पडला आहे. यामुळे त्यांनी याचे उत्तर थेट आरटीओकडूनच मागवले आहे. (Gujrat police ask RTO, is there enough space in SUV Car for Rape on Back seat.)


एक तरुणी तिच्यावर एका नराधमाने त्याच्या एसयुव्हीमध्ये बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार घेऊन गेली होती. त्याची चौकशी करायची सोडून पोलिसांना विचित्रच प्रश्न पडला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई करायची सोडून एसयुव्हीमध्ये बलात्कार करता येतो का याचे उत्तर शोधत आहेत.  स्थानिक गुन्हे शाखेने बडोद्याच्या आरटीओ अधिकाऱ्याला स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? असा प्रश्न विचारला आहे. 


याशिवाय पोलिसांनी सेंट्रल लॉकिंग सिस्टिमचीदेखील माहिती मागविली आहे. बडोदा आरटीओने सांगितले की, हा या प्रकारचा पहिलाच प्रकार आहे. एखाद्या बलात्काराच्या घटनेत वाहनाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही एसयुव्ही एका बड्या पुढाऱ्याची आहे. भद्र पटेल असे त्याचे नाव असून तो भाजी मंडई महामंडळाचा माजी अध्यक्ष होता. त्याची गुन्ह्याची मोठी पार्श्वभूमी आहे. 


एखाद्या गुन्ह्यात गाडी वापरली असेल तर सामान्यपणे आरटीओकडे गाडीचे फिटनेस सर्टिफिकेटची माहिती मागितली जाते. अशा प्रकराची माहिती मागण्याचा पहिलाच प्रकार आहे, की गाडीत किती जागा असते. या प्रश्नावर खुद्द आरटीओने नाराजी व्यक्त केली आहे. बलात्कारासारखी घटना मागच्या सीटवर होऊ शकते का असा प्रश्न पोलिसांनी विचारला आहे. यावर त्यांनी पीडितेच्या तक्रारीवरून आपल्याला ही माहिती हवी असल्याचे कारण दिले आहे. तसेच तिच्यावर बलात्कार होत असताना पीडितेने तेथून पळण्याचा प्रयत्न केला का नाही, यासाठी सेंट्रल लॉकिंग सिस्टिमची माहिती मागितली आहे. 

काय आहे घटना....
पोलिसांमध्ये नोंद झालेल्या तक्रारीनुसार घटना 26-27 एप्रिलच्या रात्रीची आहे. 30 एप्रिलला तक्रार दाखल झाली आहे. दोन मे रोजी आरोपीला अटक करण्यात आली. पटेल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पटेल आणि पीडिता हे एका कॉमन मित्रामुळे एकमेकांना ओळखत होते. पीडिता एका पार्टीला गेली होती. तिला रात्री उशिर झाल्याने तिने तिच्या मित्राला न्यायला येण्यास सांगितले होते. त्या मित्राने पटेलला पाठवून दिले. पटेलने अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तसेच धमकी दिली की कोणाकडे तक्रार करू नको. 
 

Web Title: Does the SUV have enough space to rape? Gujarat Police's embarrassing question to RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.