श्वानाला जीवे मारले, तक्रारीवरून दिल्ली पोलिसांचा हवालदार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:02 PM2022-03-08T14:02:32+5:302022-03-08T14:03:17+5:30
Dog Killed Case : श्वानाचा मृत्यू झाल्यानंतर सेक्टर 44 मधील रहिवासी शिखा रायपूर यांनी विनोद कुमार विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
रस्त्यावरील श्वानाला जीवे मारल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलीस दलातील हवालदाराला ३९ नोएडा पोलीस स्टेशनने अटक करून तुरुंगात पाठवले आहे. त्याचवेळी श्वानप्रेमीसोबत आरोपीचा जोरदार वाद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी विनोद बोलताना दिसत आहे की, श्वान आपल्या मुलाला चावायला आला होता. त्याने बेसबॉलच्या बॅटने मारले पण त्याला जीवे मारण्याचा कोणताही हेतू नव्हता.
वास्तविक ही घटना रविवारची म्हणजेच ६ मार्चची आहे. रस्त्यावरील श्वानाचा मृत अवस्थेत पडलेल्या व्हिडीओतील जोरदार वाद व्हायरल झाल्याची घटना नोएडातील ठाणे ३९ भागातील सेक्टर ४४ मधील आहे. विनोद कुमार, छलेरा सेक्टर 44 चा रहिवासी, जो एक्स पीएम सेल विनय मार्ग सिक्युरिटी लाईन दिल्लीमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे. रस्त्यावरील श्वानाला बेसबॉलच्या बॅटने मारून मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
श्वानाचा मृत्यू झाल्यानंतर सेक्टर 44 मधील रहिवासी शिखा रायपूर यांनी विनोद कुमार विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने विनोदला अटक करून कारागृहात पाठवले. अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून तो दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ आणि समाजातील लोकांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे या व्यक्तीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.