डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 08:44 AM2021-09-27T08:44:49+5:302021-09-27T08:45:23+5:30

पैसे कमाविण्याचे साधन म्हणून वापर

Dombivli gang rape case accused taken money 500 rs police investigating case crime | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये

Next
ठळक मुद्देपैसे कमाविण्याचे साधन म्हणून वापर

डोंबिवली : डोंबिवलीत १५ वर्षीय पीडित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला मित्रांच्या तर स्वाधीन केलेच, शिवाय तिच्या अब्रूची किंमत ५०० रुपये लावल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तिच्यावर आठ ठिकाणी नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला, तेव्हा एका ठिकाणी बलात्कार झाल्यावर दोघेजण मुख्य आरोपीला ५०० रुपयांच्या दोन नोटा देत होते. तिला जाळ्यात फसविल्यावर तिचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून आरोपीने वापर केला होता, हेदेखील आता उघड झाले आहे.

गेली नऊ महिने अल्पवयीन पीडितेवर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची, तसेच ठार मारण्याची धमकी देत नराधमांनी आठ ठिकाणी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. डोंबिवली पूर्वेकडील नांदीवली, देसलेपाडा, वडवली, मुरबाड येथील फार्म हाऊस, कोळेगाव, बदलापूर सर्कल याठिकाणी या बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. दारू, हुक्का, गुंगीचे औषध जबरदस्तीने पाजून तिच्यावर अत्याचार केला जात होता. दरम्यान मार्च महिन्यात एका ठिकाणी तिच्यावर तब्बल १५ जणांनी बलात्कार केला. यावेळी मुख्य आरोपीस दोघांनी प्रत्येकी ५०० रुपये दिल्याचे पीडित मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तिला वेळोवेळी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुख्य आरोपीकडून बोलावले जायचे, तेव्हाही अशाच प्रकारे तिच्या अब्रूची किंमत लावली गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

आणखी दोन आरोपींना अटक
सामूहिक बलात्काराच्या घटनेत रविवारपर्यंत ३१ नराधमांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अजून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांची विशेष पथके त्यांच्या मागावर आहेत. ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत २६ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यात दोन अल्पवयीन आरोपी होते. शुक्रवारी तिघांना जेरबंद करण्यात आले.

Web Title: Dombivli gang rape case accused taken money 500 rs police investigating case crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.