डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपींच्या विरोधात लवकर दोषारोप पत्र दाखल करावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 03:51 PM2021-10-01T15:51:29+5:302021-10-01T15:54:02+5:30

Dombivali Gangrape Case : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

Dombivli gang rape case: Chargesheet should be filed against the accused soon | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपींच्या विरोधात लवकर दोषारोप पत्र दाखल करावे

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपींच्या विरोधात लवकर दोषारोप पत्र दाखल करावे

googlenewsNext
ठळक मुद्दे समाजातील तरुणांचेही प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.शाळा बंद असलेल्या सोशल मिडिया ऑनलाईनचा वापर जास्त आहे. यासगळ्य़ात तरुण मुले गुंतली आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपीना पोलिसांनीअटक केली आहे. अटक आरोपींच्या विरोधात लवकरात लवकर दोषारोप पत्र दाखल करावी अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी  पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

डॉ. गोऱ्हे यांनी आज कल्याणचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. या भेटी पश्चात त्यांनी बलात्कार प्रकरणातील तपासासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहे. याविषयीची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांना दिली. पोलिसांच्या भेटीच्या आधी डॉ. गोऱ्हे यांनी पिडीत मुलीस सह तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. पिडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता येईल याच्या सूचना गो:हे यांनी दिल्या आहेत. तिच्या घरची परिस्थिची चांगली नाही. तिच्या वडिलांच्या रोजगाराविषयी कशी मदत करता येईल यासंदर्भात सूचना केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी तिच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली आहे. पोलिसांनी चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून पिडीतेच्या कुटुंबाला मदत करावी. सरकारच्या मनोधैर्य योजनेतूही पिडीतेच्या कुटुंबांला येत्या १५ दिवसात मदत दिली जाणार आहे असे गोऱ्हे यांनी सांगितले.


डोंबिवली बलात्कार प्रकरणातील तरुणी मिसिंग झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी केली होती. मात्र मुलगी घरी परतल्याने त्यांची काही तक्रार नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात ज्या मुली मिसिंग झालल्या आहेत. अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत. त्या घटनेतील ज्या मुली घरी परतल्या आहेत. त्यांना काही अडचणी आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या काही अडचणी आहेत. याची माहिती घेऊन सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करावा. परतलेल्या मुलीसाठी ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून मदत सेवा सुरु करावी. दर पंधरा दिवसातून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रबोधन केले जावे अशा सूचना डॉ. गो:हे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. समाजातील तरुणांचेही प्रबोधन करण्याची गरज असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.

चौकट-१९९३ साली झालेल्या वासनाकांडानंतर डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराचे प्रकरण आहे. आरोपींनी साखळी तयार करुन डोंबिवतील तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे याकडे डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. पिडीत तरुणी सध्या महिला आधार गृहात आहे. तिच्या कुटुंबियांचे मनोबल चांगले आहे. पोलिसांचे तपास कामही चांगेल असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

 

शाळा बंद असलेल्या सोशल मिडिया ऑनलाईनचा वापर जास्त आहे. यासगळ्य़ात तरुण मुले गुंतली आहेत. त्यातून ही असंवेनशीलता वाढीस चालली आहे. तरुणीला अंमली पदार्थ देऊन तिची लांडगेतोड केली आहे. तिच्या आरोपींना १०० टक्के शिक्षा व्हावी यासाठी या खटल्यात विशेष सरकारी वकील दिला जाणार आहे. रेल्वेच्या हद्दीतही महिला अत्याचाराचे गुन्हे घडतआहे. त्याकडे रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली असल्याचे सांगितले.

Web Title: Dombivli gang rape case: Chargesheet should be filed against the accused soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.