घरगुती भांडणातून सूनेनेच केला सासूचा धारदार विळ्याने खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 21:43 IST2021-06-02T21:43:28+5:302021-06-02T21:43:56+5:30
Murder Case : नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.

घरगुती भांडणातून सूनेनेच केला सासूचा धारदार विळ्याने खून
भुसावळ जि. जळगाव : घरगुती भांडणातून सूनेनेच सासूच्या डोक्यात व पाठीवर विळयाने वार करुन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी ६.४० वाजेच्या सुमारास प.क.कोटेचा विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकरणी सून उज्ज्वला सोनवणे (३८)हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे (७५) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवीद्र सोनवणे हे कोटेचा विद्यालयात सुरक्षा रक्षक आहेत. शाळेच्या परिसरातच ते आई, पत्नी उज्ज्वला हिच्यासह वास्तव्यास आहेत. सायंकाळच्या सुमारास रवींद्र हा काही साहित्य घेण्यासाठी गावात गेला होता. त्याचवेळी द्वारकाबाई व सून उज्ज्वला यांच्यात भांडण झाले. हे भांडण एवढ्या विकोपाला गेले की सूनेने धारदार विळ्याने सासूची मान, डोके व पाठीवर जोरदार वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात द्वारकाबाई जागीच ठार झाल्या. काही वेळाने रवींद्र हा घरी परतला. त्यावेळी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. यानंतर रवींद्र हा ओळखीच्या नगरसेवकाकडे गेला. नगरसेवकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर काही क्षणातच पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.
सॉफ्टवेअर इंजिनिअर ४ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये राहून परतला मायदेशी; स्वित्झर्लंडला जायचे होते पण... https://t.co/ycZbj8oX1i
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2021