घरातील दागिने, पैसे घेऊन घरगडी लंपास; दादर पोलिसांनी गुजरातमधून केली अटक

By गौरी टेंबकर | Published: April 8, 2023 05:14 PM2023-04-08T17:14:51+5:302023-04-08T17:14:57+5:30

तक्रारदार ७ फेब्रुवारी रोजी घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळले. तिजोरी तुटलेली होती आणि गोस्वामी बेपत्ता होता

Domestic servant stole, Dadar police arrested from Gujarat | घरातील दागिने, पैसे घेऊन घरगडी लंपास; दादर पोलिसांनी गुजरातमधून केली अटक

घरातील दागिने, पैसे घेऊन घरगडी लंपास; दादर पोलिसांनी गुजरातमधून केली अटक

googlenewsNext

मुंबई -  प्रभादेवीतील विष्णू कुमार गुप्तालोंग हे त्याची पत्नी आणि मुलांसह ५ फेब्रुवारी रोजी सिलीगुडीला सुट्टी घालवायला गेले असताना त्यांच्या घरातील तिजोरी फोडून सोन्याचे दागिने, इतर मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा २७ लाखांचा मुददेमाल घेऊन पळून गेलेल्या हंसपुरी गोस्वामी (३०) या नोकराला दादर पोलिसांनी अटक केली. तो  मूळचा गुजरातचा राहणारा असून पाच वर्षांपासून सदर कुटुंबाकडे घरकाम करत होता.

तक्रारदार ७ फेब्रुवारी रोजी घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळले. तिजोरी तुटलेली होती आणि गोस्वामी बेपत्ता होता तसेच त्याचा फोनही बंद होता. पोलिसांनी गोस्वामीचा शोध सुरू केला आणि त्याचे शेवटचे लोकेशन गुजरातमधील बनासकांठा येथे सापडले जिथून त्याला अटक करण्यात आली. आम्ही आरोपींकडून काही ग्रॅम सोने आणि ६.१५ लाख रुपये रोख हस्तगत केले आहेत. आम्ही आता त्याच्या मित्राचा शोध घेत आहोत ज्याला उरलेल्या वस्तू त्याने विकल्याचे त्याचे म्हणणे आहे असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Domestic servant stole, Dadar police arrested from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.