झालं ना निलंबन! 'हीरो तू मेरा हीरो है' या गाण्यावर महिला कॉन्स्टेबलने वर्दीत बनवला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 09:45 PM2022-07-01T21:45:29+5:302022-07-01T21:51:06+5:30
Suspension : हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केले आहे.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात महिला हेल्प डेस्कवर तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने पोलिसांच्या वर्दीत रील बनवल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये महिला कॉन्स्टेबल रस्त्यावरील इतर दोन पुरुष कॉन्स्टेबलसोबत हेल्प डेस्कवर बसून फिल्मी गाण्यांवर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिन्ही पोलिसांना निलंबित केले आहे.
जिल्ह्यातील शहाबाद कोतवालीमध्ये तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबल वसुधा मिश्रा या कॉन्स्टेबलचा रील व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने ती चर्चेत आली. पोलिसांच्या वर्दीत फिल्मी गाण्यांवर बनवलेले रील लोक व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टाकत आहेत.
एका व्हिडिओमध्ये एक महिला कॉन्स्टेबल 'हीरो तू मेरा हीरो है' गाण्यावर पोलिसांसोबत रस्त्यावर रील बनवताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती डेस्कवर बसून 'आँखों में शरारत है' गाण्यावर नाचताना दिसत आहे. या रीलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एका फिल्मी गाण्यावर बनवलेल्या रीलमध्ये एक्सप्रेशन देणाऱ्या या महिला कॉन्स्टेबलचे हे व्हिडिओ काही काळापूर्वीचे आहेत, जे आता समोर आले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एसपीने महिला कॉन्स्टेबल वसुधा मिश्रा आणि योगेश कुमार आणि धर्मेश मिश्रा यांना निलंबित केले आहे.