कर्जाचं आमिष अन् पैशांचा चुराडा; फसव्या योजनांना पडू नका बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:02 AM2021-08-14T06:02:01+5:302021-08-14T06:02:21+5:30
तुम्हाला अमुक एका रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे. ते मिळविण्यासाठी आमच्याकडे प्रक्रिया शुल्क भरा किंवा आमच्या मॅनेजरशी संपर्क साधा, अशा प्रकारचे संदेश येतात. असे संदेश पाठवणारे अनेक बनावट ॲप आणि संकेतस्थळे बाजारात आहेत.
तुम्हाला अमुक एका रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे. ते मिळविण्यासाठी आमच्याकडे प्रक्रिया शुल्क भरा किंवा आमच्या मॅनेजरशी संपर्क साधा, अशा प्रकारचे संदेश येतात. असे संदेश पाठवणारे अनेक बनावट ॲप आणि संकेतस्थळे बाजारात आहेत.
मोडस ऑपरेंडी काय?
अनेक बनावट संकेतस्थळे आणि ॲप बाजारात कार्यरत आहेत.
ही संकेतस्थळे किंवा ॲप तुम्हाला त्वरित आणि अल्पावधीचे कर्ज कमी व्याजदरात देऊ करतात. त्या प्रकारचे ई-मेल किंवा संदेश ग्राहकाला पाठवण्यात येतात.
‘त्वरा करा. मर्यादित कालावधीसाठी ऑफर उपलब्ध’ अशी जाहिरातही त्यासाठी केली जाते.
एकदा ग्राहक जाळ्यात अडकला की त्याच्याकडून अवाच्या सव्वा व्याज आकारणी करतात. किंवा ग्राहकाची आर्थिक फसवणूक करतात.
काय काळजी घ्यावी?
कर्ज देणारा क्रेडिट स्कोअरऐवजी वैयक्तिक तपशिलात अधिक रुची दाखवतो आहे का, हे तपासा
कर्जदाता कंपनी किंवा संस्था सरकारमान्य आहे का किंवा त्यांच्याकडे सरकारी परवाना आहे का, याची खात्री करून घ्या.
कर्जदात्याने त्यांच्या कार्यालयाचा पत्ता, फोन नंबर वा तत्सम संपर्क तपशील दिला आहे का, हे जाणून घ्या. अन्यथा नंतर त्यांच्याशी संपर्क साधण्यात नंतर व्यत्य येईल.
खऱ्या बँका, वा वित्त संस्था कागदपत्रांच्या पडताळणीपूर्वी कधीही कर्ज देऊ करत नाहीत, हे पक्के लक्षात ठेवा.
गैरबँकिंग वित्तीय सेवांचे ॲप योग्य आहे का, याचीही खातरजमा करा.