'मला सोडून जाऊ नकोस'! 40 पानांवर 40 वेळा लिहून तरुणीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 03:49 PM2018-08-09T15:49:42+5:302018-08-09T15:58:35+5:30

मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य 40 पानांवर 40 वेळा लिहून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Don't leave me, girl wrote 40 times in 40 page before suicide | 'मला सोडून जाऊ नकोस'! 40 पानांवर 40 वेळा लिहून तरुणीची आत्महत्या 

'मला सोडून जाऊ नकोस'! 40 पानांवर 40 वेळा लिहून तरुणीची आत्महत्या 

Next

बंगळुरू -  मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य 40 पानांवर 40 वेळा लिहून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार दक्षिण बंगळुरू परिसरात घडला असून, इथे पोलिसांना एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाजवळ पोलिसांना 40 पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यात प्रत्येक पानावर केवळ मला सोडून जाऊ नकोस, इतकेच लिहिलेले आहे.

 आत्महत्या करणारी तरुणी आयटी प्रोफेशनल असलेल्या के. मनीष कुमार याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून तिच्यासोबत राहणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीच्या सोबत राहणाऱ्या तरुणाने आठवडाभरापूर्वीच घर सोडले होते. त्यामुळे त्या तरुणावर हत्येचा संशय घेता येणार नाही. दरम्यान, हा तरुण आणि मृत तरुणी ज्या घराता राहायचे, त्या घराच्या मालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. मात्र घरमालकही पोलिसांना आपल्या भाडेकरूंविषयी अधिक माहिती देऊ शकला नाही.  

आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव सुषमा बी. असल्याचे निष्पन्न झाले असून, ती बेल्लारी येथीर रहिवासी होती. ती एका आयटी कंपनीत कामाला होती. तसेच त्याच कंपनीत काम करणाऱ्या के. मनीष कुमार या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान, मृत तरुणीच्या वडिलांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी मनिषविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच मनीष सोडून गेल्यानंतर ती मानसिक तणावाखालून जात होती, असी माहिती  तिच्या वडिलांनी दिली आहे.  

Web Title: Don't leave me, girl wrote 40 times in 40 page before suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.