बलात्कार करुन मेहुणीचा खून करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 08:58 PM2019-03-18T20:58:18+5:302019-03-18T20:59:39+5:30
सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी सोमवारी हा निकाल दिला.
जळगाव - सख्ख्या मेहुणीवर बलात्कार करुन तिचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी नरेंद्र बिनाबाई रतवेकर (रा. जळगाव) याला दुहेरी जन्मठेपेची (मरेपर्यंत कारावास) शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी सोमवारी हा निकाल दिला.
याबाबत माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील लोहगाव, ता.हवेली येथील दाम्पत्य सायगाव, ता.चाळीसगाव येथे रोजगारानिमित्त आले होते. या महिलेचा पती आणि लहान बहिणीचा नवरा नरेंद्र रतवेकर हे सायगाव येथील एकाच हॉटेलवर कामाला लागला होते. २२ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी या महिलेचा खून झाल्याचे आढळून आले. या घटनेनंतर मारेकरी नरेंद्र हा फरार झाला होता. याप्रकरणी मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. शवविच्छेदन अहवालात महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. बलात्काराला विरोध केला म्हणून नरेंद्रने पीडितेचा खून केला व पुरावा लपविण्याच्या उद्देशाने वाळू टाकून प्रेत पुरण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुरेंद्र जी.काबरा यांनी काम पाहिले.