क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांची गळा दाबून हत्या; दुहेरी हत्याकांडानं गावात दहशतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:00 AM2020-07-21T11:00:01+5:302020-07-21T11:01:06+5:30

पोलिसांनी संशयित आरोपी रोहताश आणि बिरजूला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, त्यावेळी या दोघांनी चंदन आणि पप्पूची हत्या केल्याचं उघड केले.

Double Murder Of Friends In Mathura Crime News | क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांची गळा दाबून हत्या; दुहेरी हत्याकांडानं गावात दहशतीचं वातावरण

क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांची गळा दाबून हत्या; दुहेरी हत्याकांडानं गावात दहशतीचं वातावरण

Next

मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा येथे दुहेरी हत्याकांडानं खळबळ माजली आहे. बरसाना परिसरातील मेहराना गावात दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावून या दोन युवकांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर दोघांचे मृतदेह भडौखर-बदनगढ जंगलात फेकून देण्यात आले, मयताच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह फेकल्याचं ठिकाण शोधून काढलं.

रविवारी एसएसपी डॉ. गौरव कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शुक्रवारी सकाळी रोहताश पुत्र शिवराज आणि बिरजू पुत्र पौहपसिंह मेहराना येथे राहणाऱ्यांनी त्यांच्या दोन साथीदारांना चंदन आणि पप्पूला घरी बोलावलं होतं. रोहताशने चंदन आणि पप्पूला दारु पाजण्यासाठी आणि शेतात गांजा एकत्रित करण्यासाठी सांगितले होते. रात्री उशिरा चंदन आणि पप्पू घरी पोहचले नाहीत म्हणून नातेवाईकांना शंका आली. त्यानंतर या दोघांचा शोध घेताना रोहताश आणि बिरजू या दोघांना गावात फिरताना पाहिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी संशयित आरोपी रोहताश आणि बिरजूला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, त्यावेळी या दोघांनी चंदन आणि पप्पूची हत्या केल्याचं उघड केले. बिरजूने दाखवलेल्या प्रमाणे पोलिसांनी एका शेतातून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पकडलेल्या दोन्ही आरोपींकडून पुरेसे पुरावे मिळाले आहेत. या दोघांनी गळा दाबून २ जणांची हत्या केली, पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर याची पुष्टी होणार आहे. नंदगाव परिसरात झालेल्या दोन मित्रांच्या हत्येने पोलीस सतर्क झाली आहे. आरोपींच्या घराजवळ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. घटनेनंतर गावात संतापाचं वातावरण आहे.

Web Title: Double Murder Of Friends In Mathura Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.