दुहेरी हत्याकांडानं तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी हादरलं; धारदार शस्त्रानं वृद्ध जोडप्याची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 04:36 PM2022-01-22T16:36:33+5:302022-01-22T16:43:29+5:30

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सदर प्रकार घडला असून घरातील टीव्ही चालूच असून स्वयंपाकघरात जेवणसुद्धा तसेच असलेले आढळले आहे

Double murder in Vajreshwari; Elderly couple killed by sharp weapon | दुहेरी हत्याकांडानं तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी हादरलं; धारदार शस्त्रानं वृद्ध जोडप्याची हत्या 

दुहेरी हत्याकांडानं तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी हादरलं; धारदार शस्त्रानं वृद्ध जोडप्याची हत्या 

Next

दीपक देशमुख 

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी जवळील अंबाडी रस्त्यावर असणाऱ्या पेंढरी पाडा येथील वृद्ध पती पत्नीचा धारधार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केल्याचे घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. जगन्नाथ (बाळू)पाटील वय ८३,सत्यभामा पाटील वय ७५ अशी हत्या झालेल्या वृद्ध पती पत्नीची नावे असून ते वज्रेश्वरीजवळ अंबाडी रस्त्यालगत आपल्या घरात दोघेच शेती करून राहत होते.त्यांची घराजवळ जवळपास तीस एकरहून अधिक शेती असून त्यात त्यांनी एक तलावसुद्धा काढला आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सदर प्रकार घडला असून घरातील टीव्ही चालूच असून स्वयंपाकघरात जेवणसुद्धा तसेच असलेले आढळले आहे तर महिलेच्या अंगावरील दागिनेसुद्धा तसेच आहेत.सकाळी सदर पती पत्नी अजून बाहेर कसे आले नाही हे बघण्यासाठी घराजवळ असलेल्या घरातील एका मुलाने खिडकीतून पाहिले असता रक्ताच्या थाळोऱ्यात दोघा पती पत्नीचे मृतदेह दिसून आले असता त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्यामुळे प्रथमदर्शनी सदर हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली आहे की संपत्तीच्या वादातून झाली आहे हे दिसून येत नाही कारण महिलेच्या अंगावर दागिने तसेच असल्याने आणि घरातील वस्तू तसेच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान सदर पती पत्नीचे दोन मुले असून ते बाहेर वास्तव्यास आहेत तर काही नातेवाईकांशी त्यांचा जमिनीच्या कारणावरून वादही चालू असल्याची माहिती मिळाली आहे तर काही महिन्यांपूर्वी मुंबई वडोदरा या महामार्गामध्ये त्यांची जागा गेली होती त्याचे मोठ्या प्रमाणात रक्कमही मिळाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. एका संशयित इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन असून अधिक तपास गणेशपुरी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे हे करीत असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.

Web Title: Double murder in Vajreshwari; Elderly couple killed by sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.