कामोठेत दुहेरी हत्याकांड; दिराकडून भावजय, लहान पुतण्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:39 IST2019-09-10T11:02:38+5:302019-09-10T12:39:57+5:30
कामोठेमध्ये सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटी आहे.

कामोठेत दुहेरी हत्याकांड; दिराकडून भावजय, लहान पुतण्याचा खून
पनवेल : पनवेलमधील कामोठे येथे मंगळवारी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले. दिराने भावजय आणि दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी सुरेश चव्हाण याला कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सेक्टर ३५ मधील ही घटना आहे.
कामोठेमध्ये सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटी आहे. यामध्ये जयश्री योगेश चव्हाण (वय 22) या दोन वर्षांच्या मुलासह राहत होत्या. लहान भावाने घरातून बाहेर काढल्याचा जुना राग आरोपीच्या मनात होता. यामुळे भाऊ घरात नसल्याचे पाहून आरोपी त्यांच्या घरात गेला. यानंतर भावजयीवर जबरदस्ती केली. तिने विरोध केल्याने आरोपीने तिचा धारधार वस्तूने खून केला. तसेच घरात असलेल्या लहान मुलाचाही खून केला. आरोपीविरोधात पहाटे 4.13 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
त्यांची आणि मुलगा अविनाश याची सख्ख्या दिरानेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपी सुरेश दिनकर चव्हाण (30) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.