संशयास्पद! इंजिनिअरने कुटुंबासह घेतले विष; पती, पत्नी आणि मुलगी तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:00 PM2022-07-27T17:00:49+5:302022-07-27T17:01:46+5:30

Crime News : वडील आणि मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Doubtful! Engineer took poison with family; Death of husband, wife and daughter | संशयास्पद! इंजिनिअरने कुटुंबासह घेतले विष; पती, पत्नी आणि मुलगी तिघांचा मृत्यू

संशयास्पद! इंजिनिअरने कुटुंबासह घेतले विष; पती, पत्नी आणि मुलगी तिघांचा मृत्यू

Next

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जानकीपुरममध्ये ही घटना घडली. ट्यूबवेल विभागातील एका जेईने पत्नी आणि मुलीसह विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे. वडील आणि मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्यूबवेल विभागात जेई म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र कुमार (वय ४५), त्यांची पत्नी गीता (४० वर्षीय) आणि मुलगी प्राची (१७ वर्षीय) यांनी विष प्राशन केले. तिघांनाही तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. शैलेंद्र आणि प्राची यांना डॉक्टरांनी तत्काळ मृत घोषित केले, तर गीताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्यात मृतांनी काही लोकांची नावे लिहिली आहेत. हे लोक कुटुंबाला धमकावत होते, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याप्रकरणी उत्तर विभागाचे डीसीपी कासिम अब्दी यांनी सांगितले की, एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये काही लोकांची नावे लिहिली आहेत, आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करू आणि त्यांची चौकशी करू.


काय आहे संपूर्ण प्रकरण? 
जानकीपुरम एक्स्टेंशन परिसरात शैलेंद्र कुमार आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे. मुलगा सध्या बंगळुरू येथे एका क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता. बुधवारी शैलेंद्र हे पत्नी गीता आणि मुलगी प्राचीसह घरात होते. पोलिसांनी सांगितले की, सकाळी 9.30 वाजता शेजाऱ्यांनी आम्हाला तिघांनी विष प्राशन केल्याची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घर गाठले आणि तिघांनाही ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी पिता-मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. आई आईची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला, पण तिचाही मृत्यू झाला. फॉरेन्सिक टीम घरी पोहोचली आहे. जानकीपुरम एक्स्टेंशन पोलिसांचे म्हणणे आहे की, आम्हाला एक सुसाइड नोट सापडली आहे, घराची झडती घेतली जात आहे आणि फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच या तिघांना ज्या शेजाऱ्यांनी आधी पाहिले होते, त्यांची पोलीस चौकशी करत आहेत. सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

 

बाप और बेटी की मौत

Web Title: Doubtful! Engineer took poison with family; Death of husband, wife and daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.