रेमेडेसिविर प्रकरणात डॉ. मालुसरेला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 09:50 PM2021-06-19T21:50:19+5:302021-06-19T21:51:25+5:30

राज्यभर गाजलेल्या शासकीय रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील आरोपी डॉ. पवन मालुसरे याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले.

dr malusare get police custody for remdesivir black marketing | रेमेडेसिविर प्रकरणात डॉ. मालुसरेला पोलीस कोठडी

रेमेडेसिविर प्रकरणात डॉ. मालुसरेला पोलीस कोठडी

Next

अमरावती : राज्यभर गाजलेल्या शासकीय रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील आरोपी डॉ. पवन मालुसरे याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस चौकशीत डॉ. मालुसरेने किती जणांना रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी दिले, हे तथ्य उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपी नर्स पूनम भीमराव सोनोने ही अद्यापही पसार असून, तिचा शोध पोलीस घेत आहे.

मास्टर माईन्ड डॉ. मालुसरे यांनी अन्य आरोपींच्या माध्यमातून रेमडेसिविर इंजेक्शनची काळाबाजारी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. परंतु डॉ. मालुसरे व नर्स पूमन हे पसार झाले होते. त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे डॉ. मालुसरेने न्यायालयात आत्मसर्मपण केले. त्याला ताब्यात घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर शनिवारी सुनावणी झाल्यानंतर डॉ. मालुसरेला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अतुल वर करीत आहेत.
 

Web Title: dr malusare get police custody for remdesivir black marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.