डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:53 PM2020-01-21T15:53:20+5:302020-01-21T15:54:23+5:30
पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज पुणेसत्र न्यायालयाने फेटाळला. विक्रम भावे यांच्यावर डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा आरोप असून पुढील सुनावणी ३० जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
गेल्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेले विक्रम भावे यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी विक्रम भावेचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावी अशी मागणी जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली होती. डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.
2013 Dabholkar murder case: Pune Sessions Court has rejected the bail application of accused Vikram Bhave
— ANI (@ANI) January 21, 2020
संजीव पुनाळेकर यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्यावर दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे. तत्पूर्वी दाभोळकर यांच्याबाबत सर्व माहिती भावे याने रेकी करून त्यांना दिली. न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्याायालयाने संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
डाॅ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) January 21, 2020