डॉ. पायल तडवी प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 02:24 PM2019-05-30T14:24:26+5:302019-05-30T14:25:56+5:30
गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
मुंबई - डाॅ. पायल तडवीआत्महत्या प्रकरण आता आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखा पुढील तपास करणार आहे. पायल तडवीआत्महत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. २२ मे रोजी ही धक्कादायक घटना घडली तेव्हापासून आग्रीपाडा पोलीस या घटनेचा तपास करत होते. मात्र, या गुन्ह्याची गंभीरता आणि महत्व लक्षात घेता गुन्हे शाखेकडे पायलच्या आत्महत्येचा तपास वर्ग करण्यात आला आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना आज सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपासासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र पायलच्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. काल सुनावणीदरम्यान न्यायालयात पायलची बाजू मांडणारे वकील नितीन सातपुते यांनी पाटीलच्या मानेवर, पाठीवर आणि गुप्तांगावर जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले असल्याने ही आत्महत्या नसून हत्या केली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गुन्हे शाखा या अतिशय गंभीर अशा गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याची शक्यता आहे.
मुंबई - डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग, गुन्हे शाखा करणार पुढील तपास https://t.co/thzM8ylhGc
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2019
#शिवसेना#म#मराठी ३०मे डॉ. पायल तडवी आत्महत्या केस तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे मी केलेल्या मागणीनुसार CM देवेंद्र फडणवीस यांनी सोपविला.माझ्याकडे जेष्ठ वकील अँड.नितीन सातपुते यांनी मुद्दा उपस्थित केला होता.हा तपास क्राईम ब्रँचकडे सोपविला असल्याचे मुंबई श्री संतोष रस्तोगींनी कळवले.
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) May 30, 2019