डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध सुरू, करजगी कुटुंबीयांच्या जबाबासंदर्भात गोपनीयता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 04:53 AM2020-12-06T04:53:32+5:302020-12-06T07:07:59+5:30

डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे.

Dr. The search for the thread behind the death of Sheetal Amte continues | डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध सुरू, करजगी कुटुंबीयांच्या जबाबासंदर्भात गोपनीयता

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध सुरू, करजगी कुटुंबीयांच्या जबाबासंदर्भात गोपनीयता

googlenewsNext

- राजेश भोजेकर
 
चंद्रपूर - कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शोधण्यातच पोलिसांचा वेळ जात आहे. त्यामुळे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मृत्यूमागील नेमक्या कारणांचाही शोध घेणे सुरू केले आहे.  

डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. यासाठी पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट पाहावी लागत आहे. हा अहवाल केव्हा प्राप्त होईल, याबाबत पोलीसही  अनभिज्ञ आहेत. तो अहवाल जलदगतीने प्राप्त व्हावा म्हणून स्वत: पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी प्रयोगशाळा प्रमुखांना पत्र दिले आहे.
 
डाॅ. शीतल या मानसिक तणावात होत्या, ही बाब तपासात पुढे आली असल्याचे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. या मानसिक तणावाचे काय कारण होते, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आनंदनातील काही जणांचे जबाब नोंदविले आहेत. मृत्यूला कौटुंबिक कलह कारणीभूत आहे का, या दिशेनेही शोध सुरू आहे.  

घटनेच्या दिवशी पती गौतम करजगी हे घरी आले तेव्हा त्यांनी डाॅ. शीतल यांना आवाज दिला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दाराची कडी आतून लावलेली होती. 
गौतम यांनी दार उघडल्यावर डाॅ. शीतल खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना आनंदवनमधील रुग्णवाहिकेतून थेट उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. 
या घटनाक्रमाबाबत पोलिसांनी करजगी कुटुंबीयांचे जबाब नोंदविलेले आहेत. मात्र पोलिसांनी ते गोपनीय ठेवले आहेत.

गरज भासल्यास आमटे कुटुंबीयांची विचारपूस
nपाेलीस सूत्रानुसार, डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागे थेट कौटुंबिक कलहाचे कारण जोडता येत नाही. 
nत्यांच्या मृत्यूच्या आठ-दहा दिवसांपूर्वीपर्यंत आमटे कुटुंबीय डाॅ. शीतल यांच्या संपर्कात नव्हते. 
nत्यामुळे आधी मृत्यूच्या कारणांचा 
उलगडा केला जाईल, त्यानंतर घटनाक्रम शोधला जाईल. गरज भासल्यास 
आमटे कुटुंबीयांची विचारपूस केली 
जाईल.
 

Web Title: Dr. The search for the thread behind the death of Sheetal Amte continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.