डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 01:15 AM2020-12-05T01:15:33+5:302020-12-05T07:43:01+5:30

कुत्र्याला द्यायचे कारण देत मागितले इंजेक्शन; मृत्यूच्या दिवशी डाॅ. शीतल आमटे घराबाहेर पडल्या नाहीत

Dr. In the Sheetal Amte suicide case, police say, two strong pieces of evidence were found | डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले

googlenewsNext

राजेश भोजेकर

चंद्रपूर : नागपूर येथील एका औषध विक्रेत्याकडून कुत्र्याला मारण्याचे पाच इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्याचा पुरवठादेखील आनंदवन येथील रुग्णालयाला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दिशेनेदेखील तपासाची चक्रे फिरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मृत्यू झाल्याच्या दिवशी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे बाहेरच पडल्या नव्हत्या. त्या दररोज सकाळी ९ वाजता न चुकता कार्यालयात जायच्या. परंतु त्यादिवशी मात्र त्या बाहेरच आल्या नाहीत.

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्युला पाच दिवसाचा कालावधी लोटूनही मृत्युचे गूढ उकलले नाही. परंतु डाॅ. शीतल आमटे यांनी मृत्युपूर्वी आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या रुग्णालयातून कुत्र्याला देण्याचे कारण सांगून नागपूर येथून पाच इंजेक्शन मागितल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. शवविच्छेदन अहवालात डाॅ. शीतल आमटे यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण आढळली. या आधारे त्यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केला असावी, असा कयास लावला जात आहे, मात्र त्यांनी इंजेक्शनमध्ये कोणत्या औषधाचा वापर केला, ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळावरून डाॅ. शीतल यांच्या हाताला टोचलेले इंजेक्शन, न वापरलेल्या सिरिंज, संशयास्पद औषध, गोळ्या, मोबाइल, लॅपटाॅप, टॅब आदी साहित्य ताब्यात घेतले आहे. 

पोलीस म्हणतात, दोन सबळ पुरावे आढळले
डाॅ. शीतल यांच्या मृत्युप्रकरणी दोन सबळ पुरावे आढळल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. हे पुरावे सर्व बाजूने जुळतात वा नाही याचा तपास सुरू आहे. तर डाॅ. शीतल आमटे यांचा मृत्यू विषारी इंजेक्शन टोचल्याने झाल्याचा संशय पोलीस वर्तवत आहेत. इंजेक्शनची खूण त्यांच्या उजव्या हाताला असल्याचे पोलीस सूत्र सांगत आहे. डाॅ. शीतल आमटे या डावखुऱ्या नव्हत्या. मग त्यांनी उजव्या हाताला इंजेक्शन कसे घेतले? ही बाब पोलिसांना विचार करायला लावणारी असल्याचे समजते. यामागे अन्य कारण तर नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.  

Web Title: Dr. In the Sheetal Amte suicide case, police say, two strong pieces of evidence were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.