डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा आता घातपाताच्या दिशेने तपास, १६ जणांचे घेतले जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 06:36 AM2020-12-07T06:36:41+5:302020-12-07T06:37:32+5:30

Shital Amte Death case : डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेगळे वळण दिले आहे.

Dr. Shital Amte's death is now being investigated as Assassination | डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा आता घातपाताच्या दिशेने तपास, १६ जणांचे घेतले जबाब

डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा आता घातपाताच्या दिशेने तपास, १६ जणांचे घेतले जबाब

googlenewsNext

- राजेश भोजेकर
 
चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस घातपाताच्या दिशेने तपास करत आहेत. यासंदर्भात आनंदवनातील जवळपास १६ लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहे.

डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेगळे वळण दिले आहे. डॉ. शीतल यांचा घातपात तर झाला नसावा, ही बाबही पोलीस पडताळून पाहत आहेत. यासाठी आत्महत्येपूर्वी शीतल यांना कोण भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आनंदवनातील १६ जणांचे जबाब नोंदविले. दरम्यान, डॉ. शीतल या मानसिक तणावात होत्या, ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. या मानसिक तणावाचे कारण काय होते, या दिशेनेही तपास सुरू आहे. 

सोमवारी मिळणार अहवाल
 डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर काही गोष्टीसाठी व अवयव तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा कोणते वळण घेईल, हेही समजणार आहे. 

डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर पोलिसांनी त्यांचे दोन मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब तपासासाठी जप्त केले. मात्र डॉ. शीतल यांनी हे उघडण्यासाठी आपले डोळेच पासवर्ड ठेवल्याने पोलीस हतबल झाले. त्यांचा पासवर्ड तोडून काढणे येथील सायबर सेललाही शक्य न झाल्यामुळे त्यांचे मोबाईल, लॅपटॉप मुंबई सायबर सेलकडे पाठविण्यात आले आहे. त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. तो आल्यावर इतर बाबींचा खुलासा होणार आहे.

Web Title: Dr. Shital Amte's death is now being investigated as Assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.