पुरातन मूर्तीची तस्करी करणाऱ्या दोघांवरील डीआरआयच्या कायदेशीर प्रक्रियेला जोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 20:35 IST2018-08-20T19:34:08+5:302018-08-20T20:35:03+5:30
शिल्पकार असलेल्या जैनने २൦१५ मध्ये नंदासाठी प्रथम काम करण्यास सुरुवात केली. जैनने नंदासाठी कांस्यमूर्ती, गुप्तकालीन सात सोन्याच्या अंगठ्या आदी पुरातन वस्तू हॉंगकॉंगला पाठवल्याचे तपासात पुढे आले आहे. याशिवाय पार्वती व गणपतीच्या दोन मूर्ती गुजरातमधून चोरण्यात आल्याचा संशय त्यांच्यावर आहे.

पुरातन मूर्तीची तस्करी करणाऱ्या दोघांवरील डीआरआयच्या कायदेशीर प्रक्रियेला जोर
मुंबई - देशात पुरातन मूर्तीची तस्करी करणाऱ्या अनिवासी भारतीय आरोपींविरोधात आता महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाईचा बडगा उचलला आहे. विजय नंदा आणि उदित जैन अशी या दोघींची नावे आहेत. परदेशी नागरिकत्व असलेल्या या आरोपींविरोधात डीआरआयने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे.
देशातील १३ पुरातन मूर्तीची तस्करी अमेरिका, लंडन आणि हाँगकाँग येथे तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गोरेगाव येथे नंदा यांच्या घरावर कारवाई करत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १३ पुरातन मूर्ती जप्त करत अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पहिल्या शतकातील टेराकोटाच्या मूर्ती, १७ आणि १८ व्या शतकातील महिषासूरमर्दिनीच्या मूर्ती, गणेशाच्या कांस्यमूर्ती, तसेच १൦-११ व्या शतकातील दक्षिण भारताच्या मंदिरातून उखडून आणलेल्या वरद गणेश, पद्मपाणी, अवलोकितेश्वर, उभा विष्णू, नाग-नागीण आदी मुर्त्या त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या होत्या. नंदा यांना १६ कोटी १८ लाखांचा दंड आकारण्यात आला. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या तीन कोटी किंमतीच्या ४७ मूर्त्या जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मुर्त्या परदेशात नेण्यासाठी नंदाला मदत करणाऱ्या कंपनीलाही संबंधित विभागाने दंड आकारला आहे.
शिल्पकार असलेल्या जैनने २൦१५ मध्ये नंदासाठी प्रथम काम करण्यास सुरुवात केली. जैनने नंदासाठी कांस्यमूर्ती, गुप्तकालीन सात सोन्याच्या अंगठ्या आदी पुरातन वस्तू हॉंगकॉंगला पाठवल्याचे तपासात पुढे आले आहे. याशिवाय पार्वती व गणपतीच्या दोन मूर्ती गुजरातमधून चोरण्यात आल्याचा संशय त्यांच्यावर आहे. त्यासाठी नंदा नवी दिल्लीत येऊन जैनला भेटला होता. प्रत्येक एका मुर्तीमागे जैनला २५ हजार रुपये दिले जात होते.