वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत नेले फरफटत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 07:06 AM2021-03-04T07:06:40+5:302021-03-04T07:06:52+5:30

पोलीस अंमलदार जखमी; मध्यस्थी करणाऱ्या दुकलीकडूनही दमदाटी 

The driver who broke the traffic rules hit the police and fled | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत नेले फरफटत 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत नेले फरफटत 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत फरफटत नेल्याचा प्रकार आझाद मैदान पोलिसांच्या हद्दीत घडला. यात अन्य सहकाऱ्याने चालकाला पकडून कारवाई करीत असतानाच तेथे धडकलेल्या दुकलीने मोबाइल शूटिंग करून पोलिसांना शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. आझाद मैदान वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस हवालदार विजय भिवराव  असवले यात जखमी झाले. 


असवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास डी. एन. रोड येथे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्ससमोर असवले हे वॉर्डनसोबत कार्यरत होते. नाकाबंदीची कारवाई सुरू असताना, रात्री पावणेदहाच्या सुमारास एक तरुण जे. जे. ब्रिजच्या दिशेने भरधाव वेगाने येताना दिसला. ब्रिजवर दुचाकी वाहनांना बंदी असल्याने त्यांनी तरुणाला थांबण्याचा इशारा केला. मात्र ताे न थांबता त्याने असवले यांना धडक देत फरफटत नेले. वाहतूक वॉर्डन विजाज रियाज सुलेमान यांनी त्याला पुढे जाऊन अडवले. अन्य दोन पोलीस अंमलदार तेथे आले. त्यांनी चालकास ताब्यात घेत चौकशी केली. चाैकशीत त्याचे नाव शारजील जाकीर अली खान (२३) असून, तो नागपाडा येथील रहिवासी असल्याचे समजले.                      त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा करीत असतानाच तेथे धडकलेल्या दुकलीने पोलिसांसोबत हुज्जत घातली आणि मोबाइलवर व्हिडिओ शूटिंग करू लागले. 

चालकासह साथीदारांना घेतले ताब्यात
पाेलीस समजावत असताना एक जण पोलीस शिपाई सुनील बोरसे यांच्या अंगावर धावून गेला. दमदाटी केली. नियंत्रण कक्षात कॉल करून पोलिसांनी मदत मागितली. आझाद मैदान पोलिसांनी तेथे येऊन चालक शारजील, मोहम्मद कैफ खान (२१),  फैजल अब्दुल रहीम शेखवर (२३) गुन्हा नोंद केला. असवले यांच्या पायाला दुखापत झाली.

Web Title: The driver who broke the traffic rules hit the police and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.