विरुद्ध दिशेने वाहने चालविणे महागात; थेट गुन्हे दाखल होऊ लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 10:21 AM2022-03-09T10:21:35+5:302022-03-09T10:21:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी देताच, सोमवारी पहिल्या दिवशीच ३५ गुन्हे नोंदवण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडे हे दर रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार असून आठवड्याच्या कामांची माहिती देणार आहेत. विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांवर आता बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली. त्यानुसार सोमवारी कारवाईचा वेग वाढला आहे.
यादरम्यान विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या विरोधात ३५ गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यामध्ये वन वे कारवाई (५६४), पार्किंग नियम उल्लंघन (२०४७), सीट बेल्टचा वापर न करणे (६५८), विनाहेल्मेट (२८६४), बेवारस वाहने उचलणे (२२६) तसेच विना परमिट वाहन चालविल्याप्रकरणी ७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.