नशेबाज आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर ओतले गरम पाणी, १ तास तडफडून झाला मृत्यू 

By पूनम अपराज | Published: December 18, 2020 03:25 PM2020-12-18T15:25:45+5:302020-12-18T15:27:10+5:30

Murder : 26 वर्षीय कैटी क्राउडरने आपली निष्पाप मुलगी ग्रेसी क्राउडरच्या अंगावर गरम पाणी ओतले होते आणि नंतर ती स्वत: साफसफाईच्या कामाला लागली. 

An drug addicted mother poured hot water on her one and a half year old girl and died after suffering for 1 hour | नशेबाज आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर ओतले गरम पाणी, १ तास तडफडून झाला मृत्यू 

नशेबाज आईने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीवर ओतले गरम पाणी, १ तास तडफडून झाला मृत्यू 

Next
ठळक मुद्देया महिलेस किंग्ज मिल हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली. मात्र, क्रॉडरने मुलीच्या हत्येचा आरोप फेटाळून लावला. अटक आईने सांगितले की, त्यावेळी ती आपल्या कुत्र्यासाठी साफसफाई करीत होती.

लंडनमधील एका निर्दयी आईने आपल्या 19 महिन्यांच्या मुलीवर गरम पाणी ओतले. तासाभर रडत असताना आणि मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणात, निर्दय आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


26 वर्षीय कैटी क्राउडरने आपली निष्पाप मुलगी ग्रेसी क्राउडरच्या अंगावर गरम पाणी ओतले होते आणि नंतर ती स्वत: साफसफाईच्या कामाला लागली. महिलेवर गुन्ह्याच्या खटल्याच्या वेळी सरकारी वकील म्हणाले की, मुलीचा नैसर्गिक मृत्यू नव्हते. मुलाला मरेपर्यंत तब्बल एक तास त्याच तडफडणाऱ्या स्थितीत सोडले होते. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश जेरेमी बेकर यांनी ही घटना अत्यंत खेदजनक व धक्कादायक असल्याचे सांगितले.  न्यायाधीश पुढे म्हणाले की, मुलीला खूप वेदना झाल्या असाव्यात. ग्रॅसीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गरम पाणी ओतले, त्यावेळी ती त्याच गरम पाण्यात बसली होती. यामुळे, बाळाची त्वचा 65 टक्क्यांपर्यंत भाजली गेली, असे न्यायधीश म्हणाले.

चिमुकलीचा तात्कळ मृत्यू झाला  नाही - न्यायाधीश
न्यायाधीश पुढे म्हणाले की, वैद्यकीय अहवालात असे स्पष्ट झाले आहे की, मुलगी तातडीने मरण पावली नाही, मुलीने एक तासाने वेदना सहन केल्या त्यानंतर तिचा मृत्यू झाला. न्यायाधीश म्हणाले की, दुखापतीमुळे बाळाच्या रक्तवाहिन्यांमधील द्रव बाहेर पडला, ज्यामुळे मुलीच्या अवयवांनी कार्य करणे थांबवले आणि अखेर तिचा मृत्यू झाला.

न्यायाधीश पुढे म्हणाले की, कोणतेही कारण असले तरी तुम्ही ताबडतोब ग्रॅसीला डॉक्टरकडे घेऊन जायला हवे होते. त्यामुळे तिचा जीव वाचला असता तर तुम्ही जळवळच  राहणाऱ्या  आपल्या आई -वडिलांची मदत घेतली नाही आणि तुम्ही तुमच्या मुलीला असेच तडफडत सोडले.



ती महिला मानसिक आजारी होती
न्यायाधीशांनी सांगितले की, मानसशास्त्र अहवाल लक्षात घेऊन क्रॉडर मानसिक तणावग्रस्त आणि मानसिकरित्या ग्रस्त होती असा निष्कर्ष काढला. ग्रॅसीच्या मृत्यूच्या वेळी क्रोडरने बऱ्यापैकी कोकेन सेवन केले  होते, परंतु या गोष्टीचा अद्याप खुलासा झालेला नाही की, गरम पाणी ओतण्यापूर्वीच क्रोडरने ड्रग्ज सेवन केले होते का?.

या महिलेस किंग्ज मिल हॉस्पिटलमधून अटक करण्यात आली. मात्र, क्रॉडरने मुलीच्या हत्येचा आरोप फेटाळून लावला. अटक आईने सांगितले की, त्यावेळी ती आपल्या कुत्र्यासाठी साफसफाई करीत होती.

Web Title: An drug addicted mother poured hot water on her one and a half year old girl and died after suffering for 1 hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.