Sushant Singh Rajput case: सुशांतसिंह राजपूतला ड्रग देणारा सापडला; गोव्यात NCB ची मोठी कारवाई सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:24 PM2021-03-08T12:24:39+5:302021-03-08T12:44:19+5:30
Sushant Singh Rajput drug Case: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (एनसीबी)ने शुक्रवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दोषारोपपत्रात ३३ आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Case) की हत्या हे अद्याप जाहीर झालेले नसले तरीदेखील नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (एनसीबी)ला मोठे यश मिळाले आहे. सुशांतसिंह राजपूतला थेट ड्रग पुरविणारा माफिया एनसीबीच्या ताब्यात आला आहे. गोव्यात एनसीबीची मोठी कारवाई सुरु आहे. (Three persons including one person who was providing drugs to Bollywood actor late Sushant Singh Rajput have been arrested by NCB in Goa: Sameer Wankhede, Narcotics Control Bureau, Mumbai)
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल (NCB)ने शुक्रवारी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दोषारोपपत्रात ३३ आरोपींची नावे नमूद करण्यात आली. त्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. एनसीबीचे मुख्य समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात ११,७०० पानांचे दोषारोपपत्र सादर केले. जप्त केलेले ड्रग्स आणि आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती आहे. तसेच २०० साक्षीदारांची नावेही आहेत. एकूण ३३ आरोपींपैकी अद्याप आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर रिया आणि शोविक जामिनावर सुटले आहेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींबाबत तपास सुरू आहे, असे एनसीबीने सांगितले.
गेल्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू झाला. अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले. मोबाइल फोनही जप्त करण्यात आले. अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील माहिती मोबाइलमधून घेण्यात आली, असे दोषारोपपत्रात म्हटले आहे.
Three persons including one person who was providing drugs to Bollywood actor late Sushant Singh Rajput have been arrested by NCB in Goa: Sameer Wankhede, Narcotics Control Bureau, Mumbai
— ANI (@ANI) March 8, 2021
यानंतर देशातील अंमली पदार्थाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या गोव्यामध्ये एनसीबीने छापे मारायला सुरुवात केली आहे. गोव्यातील काही ठिकाणी एनसीबीने छापे टाकले असून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केल्याने माफियांचे धाबे दणाणले आहेत. काही ड्रग पेडलरना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. गोव्यातील कारवाईत एनसीबीच्या हाती सुशांत राजपूतला ड्रर पुरविणारा माफियादेखील लागला आहे. एनसीबीने तीन जणांना अटक केली आहे, असे एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले.
Narcotics Control Bureau, Goa along with a team of NCB Mumbai conducted searches in Mazal Wado, Assagao in the intervening night of 7/8 March & recovered drugs including 41 blots of LSD, 28 gm charas, 22 gms cocaine, 1.100 kg ganja; 2 foreign nationals arrested
— ANI (@ANI) March 8, 2021