ड्रग्ज तस्कर सूर्यदीप मल्होत्राला अटक, एनसीबीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 06:24 AM2020-09-15T06:24:23+5:302020-09-15T06:24:47+5:30
ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या चौघांना सोमवारी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी करमजीत सिंग, संकेत पटेल, अंकुश आर्नेजा यांना तीन दिवसांची एनसीबी कोठडी तर अनुज केशवानीला २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली.
मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघड करण्याच्या मागावर असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शोविक चक्रवर्तीचा शाळकरी मित्र व ड्रग्ज तस्कर सूर्यदीप मल्होत्राला सोमवारी अटक केली.
सूर्यदीपच्या घरी छापा मारून ही कारवाई करण्यात आली. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला तो ड्रग्ज पुरवित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
‘त्या’ तिघांना एनसीबी कोठडी
- ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या चौघांना सोमवारी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी करमजीत सिंग, संकेत पटेल, अंकुश आर्नेजा यांना तीन दिवसांची एनसीबी कोठडी तर अनुज केशवानीला २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली.
-आर्नेजा हा बॉलीवूडमध्ये ड्रग्ज पुरविणारा आघाडीचा तस्कर असून त्याच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. एनसीबीने गेल्या दोन दिवसांत या आरोपींसह सात जणांना अटक केली आहे. यामध्ये ड्वेन फर्नांडिस, संदीप गुप्ता आणि आफताब फतेह अन्सारी यांचाही समावेश आहे.