पहिल्यांदा पाणबुडीमधून अमली पदार्थाची तस्करी; ८६३ कोटींचे कोकेन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 07:13 PM2019-11-28T19:13:34+5:302019-11-28T19:15:14+5:30

स्पेनच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले ८६३ कोटींचे कोकेन

Drug smuggling from submarines for the first time; 863 crore cocaine seized | पहिल्यांदा पाणबुडीमधून अमली पदार्थाची तस्करी; ८६३ कोटींचे कोकेन जप्त

पहिल्यांदा पाणबुडीमधून अमली पदार्थाची तस्करी; ८६३ कोटींचे कोकेन जप्त

Next
ठळक मुद्देप्रवासादरम्यान या पाणबुडीवर लक्ष ठेवले जात होते.पाणबुडी दक्षिण अमेरिकेतून अटलांटिक महासागरामार्गे युरोपमध्ये आणली जात होती. ज्या पाणबुडीतून अमली पदार्थाची तस्करी करण्यात आली ती पाणबुडी ६५ फूट लांब आहे.

लिस्बन - पोर्तुगालमध्ये प्रथमच पाणबुडीमधून अमली पदार्थाच्यातस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोर्तुगालच्या गॅलिसियामधून स्पेनच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ८६३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. इक्वेडोरमधील २ लोकांना अटक करण्यात आली आहे, स्पॅनिशचा रहिवासी असलेला एक आरोपी फरार झाला आहे. पाणबुडी दक्षिण अमेरिकेतून अटलांटिक महासागरामार्गे युरोपमध्ये आणली जात होती. पाणबुडीने एकूण ७६९० कि.मी.चा प्रवास केला. प्रवासादरम्यान या पाणबुडीवर लक्ष ठेवले जात होते.

तस्कर नवीन मार्ग शोधत आहेत
ज्या पाणबुडीतून अमली पदार्थाची तस्करी करण्यात आली ती पाणबुडी ६५ फूट लांब आहे. याची किंमत सुमारे २० कोटी असल्याचे म्हटले जाते. दक्षिण अमेरिकन ड्रग्स माफिया जगात ड्रग्सची तस्करी करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत असल्याचे स्पॅनिश अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पकडलेल्या कोकेनच्या तस्करीमागे एक मोठा तस्करांचा गट असू शकतो.

बरेच दिवस देखरेख ठेवली जात होती या पाणबुडीवर 
स्पॅनिश वृत्तपत्र एबीसीच्या म्हणण्यानुसार, अधिकारी १५ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीने पाणबुडीवर लक्ष ठेवून होते. पोर्तुगालमधील किनारी थांबल्यानंतर धाड घालून पोलिसांनी पाणबुडी  हस्तगत करण्यात आली. दक्षिण अमेरिकेच्या गयाना आणि सुरिनाम या देशांमध्ये पाणबुडी तयार केली गेली होती. पाणबुडी कोणत्या देशातून निघाली हे अधिकाऱ्यांना अद्याप माहिती नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांना ही पाणबुडी कोलंबियातुन आल्याची  माहिती मिळाली आहे. मात्र, अधिकाऱ्यांना याची  खातरजमा केली नसली तरी पाणबुडीची ३ मेट्रिक टन सामान वाहून नेण्याची क्षमता असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

२००६ मध्ये अधिकाऱ्यांनी स्पेनमधील विगो येथून घरगुती बांधलेली पाणबुडी पकडली होती. नंतर सहा जणांना अटक करण्यात आली होती. सर्वांना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हे लोक कोकेनचे तस्कर होते.

Web Title: Drug smuggling from submarines for the first time; 863 crore cocaine seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.