फेसबुकवर झाली होती ड्रग्ज विक्रेत्यांची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 21:49 IST2019-07-01T21:47:37+5:302019-07-01T21:49:48+5:30

अँडी मातीन इडोजी आणि अल्कमा नुरुद्दीन शेख ऊर्फ आलिया अशी या दोघांची नावे आहेत.

Drugs seller had friendship on Facebook | फेसबुकवर झाली होती ड्रग्ज विक्रेत्यांची ओळख

फेसबुकवर झाली होती ड्रग्ज विक्रेत्यांची ओळख

ठळक मुद्देपाच महिन्यांपूर्वी अँडी हा बिझनेस व्हिसावर भारतात आला होता. त्या दोघांकडून 20 ग्रॅम कोकेन जप्त केले. एनडीपीस कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

मुंबई - कोकेन विक्री करण्यासाठी आलेल्या दुकलीच्या कांदिवली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अँडी मातीन इडोजी आणि अल्कमा नुरुद्दीन शेख ऊर्फ आलिया अशी या दोघांची नावे आहेत. अटक दोघे पोलीस कोठडीत आहेत.

पाच महिन्यांपूर्वी अँडी हा बिझनेस व्हिसावर भारतात आला होता. त्याची आलियासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. ते दोघे मिळून कोकेनची विक्री करायचे. आलिया अँडीकडून ड्रग खरेदी करून पब्जमध्ये जाणाऱ्या तरुणांना विकायची. कांदिवली येथील महावीर नगरमध्ये दोनजण कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक नितीन पोंदकुले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार आणि पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहून त्यांनी गाडीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अँडीची गाडी फुटपाथवर आदळली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्या दोघांकडून 20 ग्रॅम कोकेन जप्त केले. एनडीपीस कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

Web Title: Drugs seller had friendship on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.