अफगाणिस्तानमधून भारतात आलेले १ हजार कोटींचा अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 09:17 PM2020-08-10T21:17:57+5:302020-08-10T21:20:52+5:30
न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे.
नवी मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात महसूल गुप्तचर संचालनालय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI)) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून आतापर्यंतच्या सर्वात मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे.
मूळ इराणमधील तस्करांनी पाठविलेले हे हेरॉईन अफगाणिस्तानमधून भारतात आले होते. हे 191 किलो हेरॉईन प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी ड्रग्स इम्पोर्टचे कागदपत्र बनविणाऱ्या दोन कस्टम हाऊसच्या एजंटला देखील अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय चार इतर इम्पोर्टर आणि फायनान्ससर्सना अटक करण्यात आली आहे.
नेरूळच्या एम. बी. शिपिंग आणि लॉजिस्टिक सोलुशनचे कस्टम हाऊस एजंट मीनानाथ बोडके आणि मुंबईचे कोंडीभाऊ पांडुरंग गुंजाळ यांना आज न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. यामागे फार मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. त्याआधी अमृतसरमध्ये जानेवारी महिन्यात पंजाब पोलिसांच्या एसटीएफने कारवाई करून 194 किलो हेरॉईन पकडले होते. आरोपी मीनानाथ बोडके यांनी सांगितले आहे की, मोहम्मद नुमान नावाच्या माणसाने दिल्लीच्या सर्विम एक्सपोर्टचे इम्पोर्टर सुरेश भाटिया यांच्यासोबत भेट घडवून आणली होती. विशेष म्हणजे सुरेश भाटिया हा यापूर्वीही ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेला आहे. आता सर्वच गुप्तहेर यंत्रणा या प्रकरणी कसून तपास करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार
दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू