बीएस्सी शिकून त्याने केला केमिकल लाेचा; अडीच कोटींचे ड्रग्ज जप्त, पनवेलसह अलिबागमध्ये कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 09:31 AM2022-01-01T09:31:24+5:302022-01-01T09:34:01+5:30

Crime News : अटक केलेल्यांपैकी खामकर व पिट्टू हे पनवेलचे राहणारे असून, पाटील हा पेण येथे राहतो. सुभाष पाटील याने बीएस्सी (केमिकल)चे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्जविषयी माहिती होती.

Drugs worth Rs 2.5 crore seized: Action in Panvel and Alibag | बीएस्सी शिकून त्याने केला केमिकल लाेचा; अडीच कोटींचे ड्रग्ज जप्त, पनवेलसह अलिबागमध्ये कारवाई

बीएस्सी शिकून त्याने केला केमिकल लाेचा; अडीच कोटींचे ड्रग्ज जप्त, पनवेलसह अलिबागमध्ये कारवाई

googlenewsNext

नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी पनवेल व अलिबाग येथे छापा टाकून एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करीत अडीच कोटींचे ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी एकाने बीएस्सी केमिकलचे शिक्षण घेतले आहे. याच शिक्षणाचा ड्रग्ज बनविण्यासाठी वापर करण्याच्या उद्देशाने त्याने अलिबाग येथे हा कारखाना सुरू केला होता.

पनवेल येथील नेरे मार्गावर मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोलीस नाईक संजय फुलकर यांना मिळाल्याने सह पोलीस आयुक्त महेश धुर्ये, उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी, बी. एस. सय्यद, पराग सोनावणे, हवालदार रवींद्र कोळी आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास नेरे मार्गावर शंकर मंदिर परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एक कार त्याठिकाणी आली.

त्यातील इसमावर पथकाने झडप टाकून ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव कलीम रफिक खामकर (३९) असल्याचे समोर आले. त्याच्याकडील पिशवीत एक किलो मेथाक्युलॉन (एमडी) ड्रग्जची पावडर आढळून आली. अधिक चौकशीत त्याचे सहकारी जकी अफरोज पिट्टू व सुभाष रघुपती पाटील यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडूनही दीड किलो मेथाक्युलॉन (एमडी) पावडर हस्तगत करण्यात आली. तिघांकडून जप्त केलेल्या एमडी पावडरची बाजारातील किंमत २ कोटी ५३ लाख ७० हजार रुपये आहे.

ड्रग्स बनविण्यासाठी कंपनी
अटक केलेल्यांपैकी खामकर व पिट्टू हे पनवेलचे राहणारे असून, पाटील हा पेण येथे राहतो. सुभाष पाटील याने बीएस्सी (केमिकल)चे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्जविषयी माहिती होती. याच शिक्षणाचा फायदा घेत त्याने इतर दोघांच्या मदतीने अलिबागच्या पोयनाड भागात एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी कारखाना सुरू केला होता. 
 

Web Title: Drugs worth Rs 2.5 crore seized: Action in Panvel and Alibag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.