दारुडा अधिकारी करु लागला महिलांची चेकिंग; VIDEO वरून झाला गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 09:31 PM2021-12-15T21:31:36+5:302021-12-15T21:33:18+5:30
दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ Police Officer Arrested : अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली.
बिहार : बिहारच्या गोपालगंज परिसरात दारुड्या व्यक्तीला अटक करण्यासाठी गेलेला पोलीस अधिकारी ASI चंद्रमा रामच खूप दारू प्यायला असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून जोरदार गदारोळ उडाला. या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
बिहारच्या गोपालगंज परिसरात एका मेडिकल दुकानात एक दारुडा आला. त्याने दुकानदारासोबत वाद घालायला सुुरुवात केली. काही वेळाने हा वाद खूपच वाढत गेला आणि दुकानदारानं स्थानिक लोकप्रतिनिधीला तिथं बोलावून घेतलं. लोकप्रतिनिधी आले आणि त्यांनी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या रस्त्याने ASI चंद्रमा राम हे गाडीवरून जात होते. गर्दी पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि गर्दीत जाऊन घटनेबाबत माहिती काढली. त्यावेळी चंद्रमा यांच्याच तोंडाला दारूचा खूप वास येत असल्यामुळे नागरिकांनी कुजबुज सुरु केली आणि त्यांना जायला सांगून दुसऱ्या अधिकाऱ्याला पाठवण्यास सांगितले. मात्र चंद्रमा यांनी तसे न करता ते तिथून थेट संशयित आरोपीच्या घरी पोहोचले.
धक्कादायक! ८ वर्षीय बालकाला घरात बोलावून नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार
पाकिस्तानात ड्युटीवरून परतणाऱ्या ट्रान्सजेंडरचे केले अपहरण, झुडपात नेऊन केला गँगरेप
नीतीश ने बिल्ली को दूध की रखवाली का जिम्मा दिया है!
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) December 14, 2021
शराब पीकर शराब पकड़ने निकलती है नीतीश कुमार की पुलिस! महिलाओं से बदतमीजी करती है सो अलग!
अब नीतीश कुमार कहेंगे कि-"अरे पुरूष पुलिसवाले ने महिला की तलाशी ले ली तो क्या बड़ी बात हो गई? थोड़ी बदतमीजी हो गई तो भूचाल क्यों आ गया? pic.twitter.com/MUCWQ9uBvy
नशेच्या धुंदीत आरोपीच्या घरी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने आरोपीच्या घरातील महिलांची झडती घ्यायला सुरुवात केली. दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली.