मद्यधुंद पोलिसानं डिलिव्हरी बॉयला कारखाली चिरडलं; अलीकडेच कोरोनानं झालं होतं वडिलांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:35 AM2022-01-10T08:35:13+5:302022-01-10T08:35:41+5:30
Crime News : शनिवारी रात्री मारुती ब्रेझा कारने डीटीसी बस आणि दुचाकीस्वाराला धडक दिली होती.
दिल्लीच्या (Delhi) रोहिणी भागात, दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका दिल्ली पोलिस हवालदाराने एका डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) धडक दिली, ज्याचा मृत्यू झाला. सलील त्रिपाठी असे या तरुणाचे नाव असून तो झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. या घटनेनंतर आरोपी कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासमोर शनिवारी ८ जानेवारीच्या रात्री मारुती ब्रेझा कारने डीटीसी बस आणि दुचाकीस्वाराला धडक दिली होती.
ही ब्रेझा कार दिल्ली पोलीस हवालदार महेंद्र चालवत होता. त्याची पोस्टिंग रोहिणी उत्तर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. महेंद्रने हा अपघात घडवला त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता, असा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी अपघाताच्या वेळी कॉन्स्टेबल महेंद्रचा व्हिडीओही बनवला होता, ज्यामध्ये तो मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तेथे उपस्थित लोकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून महेंद्रला अटकदेखील केली आहे.
डिलिव्हरी बॉय सलिल हा आपल्या घरात एकमेव कमावता होता. तसंच सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. सध्या दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लावण्यात येत आहे. याशिवाय विकेंड कर्फ्यूही लावण्यात आलाय. अशा परिस्थितीतच ही घटना घडली आहे.