मद्यधुंद पोलिसाची तरुणी आणि तिच्या वडिलांना मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 03:03 PM2019-02-26T15:03:19+5:302019-02-26T15:04:46+5:30

याप्रकरणी तरुणीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे. 

The drunken policeman and her father beat up | मद्यधुंद पोलिसाची तरुणी आणि तिच्या वडिलांना मारहाण 

मद्यधुंद पोलिसाची तरुणी आणि तिच्या वडिलांना मारहाण 

Next
ठळक मुद्देहा मारहाणीचा प्रकार भिवंडी तालुक्यातील दापोडा येथे घडली. हल्लेखोर पोलीस कर्मचारी नारपोली ठाण्यात नेमणूकीस असून त्यापैकी दोघांना शैलेश पाटील, जाधव हे दोन पोलीस आणि दिनेश पाटील या स्थानिकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी - रस्त्यावर लघुशंका करण्यास आक्षेप घेतल्याने मद्द्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणीला आणि तिच्या वडीलांना बेदम मारहाण केली. तसेच तिचे कपडे देखील त्या पोलिसाने फाडले. मारहाण करणाऱ्यांमध्ये एका स्थानिकाचाही समावेश आहे. हा मारहाणीचा प्रकार भिवंडी तालुक्यातील दापोडा येथे घडली. हल्लेखोर पोलीस कर्मचारी नारपोली ठाण्यात नेमणूकीस असून त्यापैकी दोघांना शैलेश पाटील, जाधव हे दोन पोलीस आणि दिनेश पाटील या स्थानिकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे. 

संबंधित तरुणी गुंदवली येथे राहणारी आहे. ती मुंबईहून ग्रामसेवक भरती परीक्षा संपवून परतत होती. त्यावेळी दापोडा येथील इंडियन कॉर्पोरेशन येथील प्रवेशद्वाराजवळ ती वडीलांची वाट पाहात उभी असताना तेथे साध्या गणवेशातील दोन मद्यधुंद व्यक्ती आल्या. त्यांनी तेथे तिच्याजवळच लुघशंका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने दोघांनाही हटकले. त्यानंतर दोघांनी आम्ही पोलीस आहोत. आम्ही कोठेही काहीही करू शकतो असे उर्मट उत्तर देत तिला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी तिला मारहाण केली. तसेच तिचे कपडे देखील फाडले. त्यानंतर काही वेळातच तिचे वडील तेथे आले. त्यांनी पोलिसांना याचा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी स्थानिक एकासोबत वडीलांवरही हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलीस शिपाई शैलेश पाटील, व त्याच्या दोन्ही साथीदारांवर विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यापैकी दोघांना अटक करण्यात आले आहे.

 

 

Web Title: The drunken policeman and her father beat up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.