डीएसके पती-पत्नीवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा झाला दाखल, मुदत ठेव प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:30 AM2021-04-17T00:30:39+5:302021-04-17T00:31:08+5:30

Crime News : ठेवींचे अकरा करारनामे करून अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

DSK spouse filed another case of fraud, fixed deposit case | डीएसके पती-पत्नीवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा झाला दाखल, मुदत ठेव प्रकरण

डीएसके पती-पत्नीवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा झाला दाखल, मुदत ठेव प्रकरण

Next

पिंपरी : अधिक परताव्याचे आमिष दाखवून १७ कोटी ७० लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक सखाराम कोहकडे यांच्यासह सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेवींचे अकरा करारनामे करून अधिक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बांधकाम व्यावसायिक संदीप सुधीर जाधव (सिंधू बंगलो, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. डी. एस. के. अँड असोसिट्सचे भागीदार दीपक सखाराम कोहकडे, पत्नी भारती दीपक कोहकडे, मुलगा अश्विनीकुमार दीपक कोहकडे (सर्व रा. सोपनबाग, बालेवाडी), दीपक कोहकडे यांचा मेहुणा अनंता भिकुले (रा. बालेवाडी), मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह स्नेहल ओसवाल (रा. ईथुपिया डिव्हाइन, रुबी हॉल क्लिनिकजवळ, वानवडी), भागीदार हर्षद अशोक कुलकर्णी (रा. वूडलँड रेव्हेन्यू, गांधी भवन, कोथरूड), नोटरी आशिष ताम्हाणे (रा. बाणेर) व त्यांच्या इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  फिर्यादी एका ओळखीच्या इसमाच्या मार्फत कोहकडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी ज्यादा परताव्याच्या आमिषाने मोठ्या रकमेच्या मुदत ठेव रकमा स्वीकारल्या. काही ठेवींवर त्यांनी चांगला परतावा दिला. आणखी जादा रकमेच्या ठेवी ठेवण्यास भाग पाडले. ठेव रकमेचे आठ वेगवेगळे नोटराइज करारनामे केले. करारनाम्याप्रमाणे गुंतविलेल्या रकमेवर परतावा दिला नाही.

Web Title: DSK spouse filed another case of fraud, fixed deposit case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.