फोटो काढताना DSPच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, मित्राचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 01:45 PM2021-07-10T13:45:05+5:302021-07-10T13:45:39+5:30

Crime News : पोलिसांनी डीएसपी आशुतोष कुमार व आणखी एक मित्र सौरव कुमार यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, डीएसपीची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आली आहे.

dsp service revolver fired while posing friend died | फोटो काढताना DSPच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, मित्राचा मृत्यू

फोटो काढताना DSPच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली, मित्राचा मृत्यू

googlenewsNext

कोडरमा :  झारखंडमधील कोडरमा येथे प्रशिक्षणार्थी डीएसपीच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. पोलिसांनी डीएसपी आशुतोष कुमार व आणखी एक मित्र सौरव कुमार यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, डीएसपीची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आली आहे.

ही घटना तिलैया धरणाजवळील आहे, याठिकाणी बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डीएसपी आशुतोष कुमार हे तीन मित्रांसह सहलीसाठी आले होते. या दरम्यान सर्व्हिस रिवॉल्व्हरचा फोटो काढत असताना रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि मित्र निखिल रंजन याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत निलेश हा पाटण्यातील बेऊर येथील रहिवासी होता. सध्या पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. तसेच, पोलिसांनी डीएसपी आशुतोष कुमार आणि मित्र सौरव कुमार यांना ताब्यात घेतले असून डीएसपीची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही जप्त केली आहे.

दरम्यान, बिहारच्या बक्सर जिल्ह्याचे डीएसपी आशुतोष कुमार हे त्यांचे दोन मित्र निखिल रंजन आणि सौरव कुमार यांच्यासह तिलैया धरणाजवळ सहलीसाठी आले होते. सहलीदरम्यान डीएसपी आशुतोष कुमार यांच्या मित्रांनी रिव्हॉल्व्हर घेऊन फोटो काढण्यास सुरूवात केली. यादरम्यान रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि त्यांचा मित्र निखिल रंजन याला लागली. गोळी लागल्यानंतर निखिल रंजन यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. डीएसपीकडून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी जप्त केली आहे. याशिवाय, डीएसपी आशुतोष कुमार आणि त्यांचा एक मित्र सौरव कुमार यांनाही ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. यासंदर्भात माहिती देताना कोडरमा मुख्यालयातील डीएसपी संजीव कुमार सिंह यांनी सांगितले की, डीएसपी आशुतोष कुमार यांच्यासोबत बिहारमधील दोन अन्य मित्र सहलीला जात होते. ही घटना जाणूनबुजून की नकळत झाली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतरच हे प्रकरण समोर येईल.

Web Title: dsp service revolver fired while posing friend died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.