शिरुर तालुक्यात जमिनाच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 05:17 PM2018-10-10T17:17:37+5:302018-10-10T17:21:01+5:30
चिंचणी (ता.शिरुर) येथे जमिनीच्या वादातुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
निमोणे : चिंचणी (ता.शिरुर) येथे जमिनीच्या वादातुन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भाऊसाहेब बाबुराव धावडे(रा.चिंचणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,(दि.९) रोजी फिर्यादी यांचा चुलत भाऊ यास का मारहाण केली? याचा जाब विचारण्याच्या कारणावरुन तसेच वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरुन सुनिल धावडे,अजित धावडे,सुदाम धावडे, गोरख धावडे,संजय धावडे,रोहित धावडे,आबासो धावडे आदींनी हातातील लोखंडी रॉड व दगडाने घरात घुसुन मारहाण केली.व फिर्यादीचे दोन्ही मुले गणेश व संतोष यांना गंभीर जखमी केले.
तर दुसरी तक्रार सुनिल भिमराव धावडे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,(दि.९) रोजी सकाळी १०च्या सुमारास जमिनीचा असणारा वाद मिटविण्याकरिता बोलावुन गणेश धावडे,भाउसाहेब धावडे,संतोष धावडे,अशोक धावडे,संदिप धावडे,राजेंद्र धावडे,स्वप्निल पठारे,संपत धावडे यांनी लोखंडी गजाने,दगडाने मारहाण करुन जखमी केले व वाहनांची तोडफोड केली असल्याचे म्हटले आहे.याप्रकरणी शिरुर पोलीस पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.