प्रामाणिकपणामुळे साडेतीन लाख रुपये असलेली हरवलेली बॅग सापडली  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 09:33 PM2018-09-29T21:33:26+5:302018-09-29T21:33:45+5:30

अभिषेक सुरेंद्र पटेल असं या पैसे परत करणाऱ्या ईमानदार मुलाचे नाव आहे. पालघर मधील उसरणी गावातील रहिवासी जयेश ठाकूर हे त्यांच्याकडील साडे तीन लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी सफाळे येथे गेले होते.

Due to honesty, a lost bag containing 3.5 lakh rupees was found | प्रामाणिकपणामुळे साडेतीन लाख रुपये असलेली हरवलेली बॅग सापडली  

प्रामाणिकपणामुळे साडेतीन लाख रुपये असलेली हरवलेली बॅग सापडली  

Next

सफाळे - पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे याला फाटा देणारा किस्सा बघायला मिळाला आहे. येथील एका गरीब मुलाने 3 लाख 50 हजार रुपये रक्कम असलेली बॅग परत केल्यामुळे त्याचे परिसरात कौतुक होत आहे. अभिषेक सुरेंद्र पटेल असं या पैसे परत करणाऱ्या ईमानदार मुलाचे नाव आहे. पालघर मधील उसरणी गावातील रहिवासी जयेश ठाकूर हे त्यांच्याकडील साडे तीन लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी सफाळे येथे गेले होते. त्याच दरम्यान पैसे असलेली बॅग हरवली. यामुळे हादरलेल्या ठाकूर यांनी पोलिसात धाव घेतली. त्यामुळे सध्या ईमानदार अभिषेकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, जयेश यांची हरवलेली बॅग सफाळे येथील अभिषेक पटेल नावाच्या मुलाला सापडली होती. त्याने याबाबत आई वडिलांना सांगितले. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून देखील अभिषेकच्या आई वडिलांनी बॅग संबंधीत व्यक्तीस परत करायला सांगितले. मात्र, बॅग कशी परत करायची याबाबत अभिषेक संभ्रमात पडला. त्यानंतर त्याने याबाबतची माहिती सर्पमित्राला दिली. सर्पमित्राने ही माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली असता बॅगेच्या मालकाचा शोध लागला. सफाळे पोलीस ठाण्यात अभिषेक आणि त्याच्या आईने जयेश ठाकूर यांना हरवलेली पैशांची बॅग परत केली.

Web Title: Due to honesty, a lost bag containing 3.5 lakh rupees was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.