नोकरी गेल्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर विकू लागला ड्रग्ज, अॅपने करत होता बुकिंग
By पूनम अपराज | Published: November 7, 2020 08:50 PM2020-11-07T20:50:02+5:302020-11-07T20:50:45+5:30
Drug Case : जप्त केलेल्या ड्रग्सला अमेरिकेत एक्सोटिक, प्रीमियर इंडिको आणि हायड्रो असेही म्हणतात. भारतात ते प्रति ग्रॅम १,८०० ते ३,००० च्या दराने विकले जाते.
मोबाईल अॅपद्वारे अमली पदार्थांचा विक्री केल्याच्या आरोपाखाली अँटी नारकोटिक्स सेलने (एएनसी) मुंबईतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. लॉकडाऊनदरम्यान नोकरी गेल्यानंतर, सॉफ्टवेअर इंजिनिअरने अमेरिकेत त्याच्या संपर्कांमधून औषधे ड्रग्स आयात केले आणि नंतर भारतभर आपल्या ग्राहकांना कुरिअरद्वारे त्याची विक्री करण्यास सुरवात केली.
गुरुवारी वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीजवळ दोन लोक बॅग घेऊन संशयास्पद फिरत असताना आढळून आले आणि ड्रग्सचे जाळे उघडकीस आले. त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्याला २ किलो उच्च प्रतीचा गांजा सापडला. जप्त केलेल्या ड्रग्सला अमेरिकेत एक्सोटिक, प्रीमियर इंडिको आणि हायड्रो असेही म्हणतात. भारतात ते प्रति ग्रॅम १,८०० ते ३,००० च्या दराने विकले जाते.
एएनसी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या दोघांची नावे यश कलानी आणि गुरु जयस्वाल अशी आहे. एएनसी त्यांच्या ताब्यात चौकशी करत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल वाधवणे म्हणाले, "यश कलानी हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होता आणि लॉकडाऊन झाल्यामुळे त्याने नोकरी गमावली होती. वेबसाइटच्या माध्यमातून काही ड्रग्स सप्लायर्सना ओळखत होता आणि वैयक्तिक वापरासाठी ड्रग्स मागितली होती." त्याने पेपैल अॅपद्वारे ड्रग्सचे पैसे भरले आणि मुंबईत मागवून घेतले.
ऑगस्टमध्ये यश कलानी याने ड्रग्जच्या काळ्या व्यवसायात सामील होऊन पैसे मिळवण्याचे ठरवले. एकदा त्याने अमेरिकेतून ड्रग्स घेतले आणि मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली अशा अनेक शहरांत कुरिअरद्वारे ग्राहकांना पाठवले. अनिल वाधवान म्हणाले की, विक्र अॅपचा वापर अमेरिकेतील ड्रग्स पुरवठादारांशी आणि भारतातील पुरवठा करणार्यांशी संवाद साधण्यासाठी केला जात आहे.
विक्र अॅप एक मेसेंजर सर्व्हिस आहे. जी एंड-टू-एंड एनक्रिप्शन वापरते, वापरकर्त्यांना (युजर्स) तृतीय-पक्षाच्या कोणत्याही देखरेखीपासून संपूर्ण संरक्षण मिळते. जेव्हापासून अमेरिकेच्या एजन्सींनी विविध काळ्या धंद्यावर कारवाई सुरू केली आहे, तेव्हापासून बर्याच बेकायदेशीर बाजारावर - ड्रग कार्टेलने आपल्या ग्राहकांशी व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी विक्र सारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवा चालू केल्या आहेत.
यश कलानी यांनी चौकशी दरम्यान त्याने आयात केलेल्या दुसर्या स्टॉक कराराचा पत्ता उघडकीस आला. या खुलाशानंतर एएनसीने आणखी सात किलो ड्रग्स जप्त केली. कलानी व जयस्वाल यांच्याकडून जप्त केलेल्या ड्रग्सची एकूण किंमत सुमारे 1.62 कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत कलानी हा नेटवर्कचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजले आणि त्यांनी मुंबईत शिपमेंट पाठविण्यासाठी आणि ग्राहकांना कुरिअर पाठविण्यासाठी जयस्वाल यांची नेमणूक केली होती, अशी माहिती आज तकने दिली आहे.