ध्वनिप्रदूषणामुळे 103 गणपती मंडळांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 01:21 AM2018-09-22T01:21:02+5:302018-09-22T01:21:57+5:30
65 ते 60 डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या मंडळांवर ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल
मुंबई - गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण आणि त्यासंबंधीचे १०३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली.
गणेशोत्सव कालावधीत डीजे लावण्यास पूर्णपणे बंदी असताना देखील इतर लाऊडस्पीकरमुळे मुंबईत ठिकठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. ६५ ते ७० डेसिबलपेक्षा अधिक आवाज होऊन ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १०३ मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते शुक्रवारपर्यंत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे सिंगे यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने डीजे वापरावरील बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे डीजे लावून तसेच लाऊडस्पीकर लावून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्याचे सिंगे म्हणाले.