कबुतरावरून शेजाऱ्यांमध्ये झालं कडाक्याचं भांडण अन् हत्या करून घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:03 PM2021-02-01T14:03:22+5:302021-02-01T14:04:20+5:30
Murder : याबाबत तक्रार रणबीर सिंगच्या पत्नीने अमरगढ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भा. दं. वि. कलम ३२०, १२० ब आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शेजाऱ्याचे कबुतर परत न केल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संगरुरच्या भूमसी येथील रहिवासी असलेल्या रणबीर सिंग यांना कबूतर पाळण्याचा छंद होता. ४० वर्षाच्या रणबीरने शेजारी असलेल्या गुरप्रीत सिंग यांचं कबूतर परत करण्यास नकार दिला. यावरुनच दोघांमध्ये भांडण पेटलं. १६ दिवसांमध्ये रणबीरला २ वेळा अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याच्यावर धारदार हत्यारांनी वारही केले गेले. २९ जानेवारील दुसऱ्यांदा झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान रुग्णालयातच रणबीरचा मृत्यू झाला. याबाबत तक्रार रणबीर सिंगच्या पत्नीने अमरगढ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भा. दं. वि. कलम ३२०, १२० ब आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरगढचे एसएचओ सुखदीप सिंग म्हणाले की, कबूतर रणबीरच्या घरात घुसले होते. रणबीरने ते कबूतर शेजाऱ्यांना परत करण्यास नकार दिल्यानं मालक गुरप्रीत सिंग उर्फ प्रीतने काही साथीदारांसह १२ जानेवारीला रणबीरला बेदम मारहाण केली. तसेच रणबीरची पत्नी शरणजीत कौरने पोलिसांना माहिती दिली की, तिला १२ जानेवारीला रणबीरच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ती आपली सासू बलजिंदर कौरसोबत घराबाहेर आली. तेव्हा आरोपी रणबीरला मारहाण करत होते. शरणजीत आणि बलजिंदर यांनी आरडाओरडायला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. त्यावेळी रणबीर आरोपींच्या तावडीतून सुटला. मात्र पुन्हा २९ जानेवारीला रणबीर, बलजिंदर कौर आणि रणबीरचा भाऊ दलजीत सिंग घरी होते. सायंकाळी ६ वाजता कोणीतरी घराबाहेरुन रणबीरला बोलावले. त्यावेळी गुरप्रीतच्या कबूतर विवाद मिटवण्यासाठी तुला शेतावर बोलवत आहे, असे सांगून रणबीरला बोलवण्यात आले होते. रणबीर आपल्या गाडीवर बसून घरुन निघाला. रात्री पावणेआठच्या दरम्यान शेजाऱ्याने रणबीरला कोणीतरी मारहाण करत असल्याचे सांगितले.
माजी नगरसेवकाच्या आईची डोंबिवलीत हत्या, वृद्ध पतीने केले कृत्य
पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
रणबीरची पत्नी जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा रणबीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केले होते. यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. २०१३ साली शरणजीत आणि रणबीरचा विवाह झाला होता. शरणजीतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुरप्रीत, कमल गुरबख्श सिंग आणि अन्य व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी फरार आहेत.