सेल्फीचा मोह बेतला जीवावर; गगनचुंबी इमारतीवरून तरुणाचा गेला तोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 05:37 PM2019-05-02T17:37:26+5:302019-05-02T17:39:25+5:30
मुंबई पोलिसांकडून ट्विटरवर व्हिडीओ शेअर
मुंबई - आजकाल टेक्नोसॅव्ही जगात सेल्फीचं फॅड खूपच वाढताना दिसत आहेत. मात्र, अनेकांनी या सेल्फीच्या नादात आपला जीव गमावल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. सेल्फीच्या मोहापायी एका तरुणाने एका गगनचुंबी इमारतीवरून तोल जाऊन जीव गमावला आहे. त्यासंदर्भातला एक व्हिडीओ मुंबईपोलिसानी ट्वीट करत मुंबईकरांना असे जीवघेणे साहस करु नका असे आवाहन केले आहे.
मुंबई पोलिसांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण एका गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवर उभा आहे. इमारतीच्या गच्चीच्या कोपऱ्यावर उभा राहून तो सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात आहे. अचानक त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळतो, असा चित्तथरारक व्हिडीओ ज्यांना पाहणं सहन होईल अशानीच पाहावं असं देखील मुंबई पोलिसांकडून ट्वीट करत सांगण्यात आलं आहे. मात्र, या व्हिडीओ शेअर करण्यामागे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून अशा प्रकारे जीवघेण्या सेल्फीच्या मोहात पडू नका असे आवाहन करण्यात आलं असल्याचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच पुढे सिंगे म्हणाले की, हा व्हिडीओ मुंबईतील नसून परदेशातील व्हिडीओ असून केवळ लोकांना सतर्क करण्यासाठी मुंबई पोलिसांनी निदर्शनास आणून दिला आहे.
Attempt for the most daring selfie? Or just another irresponsible adventure? Whatever this was for, it clearly wasn’t worth the risk! #SafetyFirstpic.twitter.com/vzBYEZs54Y
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 2, 2019
Warning: It is a disturbing video.
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 2, 2019