मुलीवरून झालेल्या वादाचे हत्येत पर्यावसन, मित्राची निर्घृण हत्या करणारा ५ तासात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 08:01 PM2022-02-25T20:01:07+5:302022-02-25T20:02:17+5:30

Murder Case : गुरूवारी दुपारी अरमानचे वडील अतीक यांनी अरमानला मोबाईलवर फोन केला असता त्याने ‘मै टेकडी पे शाहरूख के साथ हु थोडी देर मे घरपे आता हु’ असे त्याने त्यांना सांगितले.

Due to girl murder occured, friend's brutal killer arrested in 5 hours | मुलीवरून झालेल्या वादाचे हत्येत पर्यावसन, मित्राची निर्घृण हत्या करणारा ५ तासात जेरबंद

मुलीवरून झालेल्या वादाचे हत्येत पर्यावसन, मित्राची निर्घृण हत्या करणारा ५ तासात जेरबंद

Next

कल्याण - शहाड परिसरातील बंदरपाडा येथे एका १६  ते १७ वयोगटातील मुलाचा शस्त्राने हत्या केलेल्या अवस्थेत मृतदेह गुरूवारी आढळून आला होता. दरम्यान या हत्येचा छडा लावण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले असून अवघ्या पाच तासात आरोपी शाहरूख यासीन शेख उर्फ इमरान (वय 20) याला अटक करण्यात आली आहे. मयत आणि आरोपीमध्ये मित्राचे नाते होते.

गुरूवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलवरून पटली. टिटवाळा, बनेली येथील कृष्णा चाळीत राहणा-या अरमान सय्यद याचा हा मृतदेह असल्याचे समोर आले. अरमान तसेच त्यांच्या परिसरात राहणारे जमिर रईस, नौशाद खान, तन्वीर अहमद, यासीन सिध्दीकी यांचे भिवंडीत राहणा-या एका मुलीवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी टिटवाळा परिसरातच राहणाऱ्या शाहरूख शेख उर्फ इमरान याच्यासोबत भांडण झाले होते. गुरूवारी दुपारी अरमानचे वडील अतीक यांनी अरमानला मोबाईलवर फोन केला असता त्याने ‘मै टेकडी पे शाहरूख के साथ हु थोडी देर मे घरपे आता हु’ असे त्याने त्यांना सांगितले.

अलविदा...माझ्या मुलाची काळजी घ्या! फेसबुक लाईव्ह करून विवाहितेने ट्रेनसमोर केली आत्महत्या

त्यानंतरही बराच वेळ अरमान घरी आलाच नाही. तेव्हा वडीलांसह आईने त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन केले. परंतू त्यांच्या फोनला त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर संध्याकाळी उशीरा त्यांना पोलिसांकडून अरमानची हत्या झाल्याची माहीती मिळाली. अरमान हा दुपारी शाहरूख बरोबर होता. त्याचा आणि त्याच्या मित्रांचा काही दिवसांपूर्वी शाहरूखशी वाद झाला होता अशी माहीती अरमानचे वडील अतिक यांच्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील, पोलिस निरिक्षक (गुन्हे) शरद झिने यांच्या पथकाने मृतदेह आढळल्याच्या घटनेपासून अवघ्या पाच तासात शाहरूखला टिटवाळा येथून शिताफीने अटक केली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 4 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Due to girl murder occured, friend's brutal killer arrested in 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.