गोल्डन अवर्समुळे आजोबांची साडे दहा लाखांची रक्कम पुन्हा खात्यात

By मनीषा म्हात्रे | Published: September 3, 2022 06:15 PM2022-09-03T18:15:22+5:302022-09-03T18:16:12+5:30

गोल्डन अवर्समुळे सायबर ठगांनी डल्ला मारलेली आजोबांची साडे दहा लाखांची रक्कम पुन्हा खात्यात वळते करण्यास ओशिवरा पोलिसांना यश आले आहे.

due to golden hour senior citizen get amount of one and a half million is back in the account | गोल्डन अवर्समुळे आजोबांची साडे दहा लाखांची रक्कम पुन्हा खात्यात

गोल्डन अवर्समुळे आजोबांची साडे दहा लाखांची रक्कम पुन्हा खात्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोल्डन अवर्समुळे सायबर ठगांनी डल्ला मारलेली आजोबांची साडे दहा लाखांची रक्कम पुन्हा खात्यात वळते करण्यास ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मो. दाऊद बशीर सय्यद (62 वर्षे रा. ठि.  पालघर)हे ओशिवरा हद्दीतील शब्बीर अहमद इंटरटेनमेंट या संगीत (गाणे) तयार करून देणाऱ्या कंपनीत अकाउंटचे काम करतात. 20 ऑगस्ट रोजी सोहम रॉक स्टार इंटरटेनमेंट वर्सोवा अंधेरी व त्यांच्या  कंपनी मध्ये दोन गाण्यांचे साडे एकवीस लाख रुपये देण्याचे करार करून सदरची रक्कम त्यांच्या कंपनीचे स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेचे खात्यात जमा करण्याबाबतचा इन्व्हाईस त्यांनी  कंपनीच्या ईमेलद्वारे पाठवले होते. त्यानंतर सोहम रॉक स्टार इंटरटेनमेंट कंपनीचे अकाउंट पाहणारे मेहुल यांनी तक्रारदार यांच्याकडून 26 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या ईमेल प्रमाणे ठरलेल्या रकमेपैकी एकूण 10 लाख 47 हजार 600/- रू. इतकी रक्कम जमा करू. मेहुल यांनी तक्रारदार यांना त्यांनी दिलेल्या कॅनरा बँकेच्या खात्यामध्ये वर नमूद प्रमाणे रक्कम जमा केल्याबाबत सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी कॅनरा बँकेत त्यांच्या कंपनीचे खाते नसल्याचे सांगू स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेत जमा करण्याबाबत ई-मेलद्वारे कळवले असल्याचे सांगितले. 

तेव्हा मेहुल यांनी ई-मेल आयडी चेक केला असता कोणी तरी तक्रारदार यांच्या कंपनीच्या ईमेल आयडी मध्ये बदल करून बनावट ईमेल तयार केल्याचे दिसून आले. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीची बनावट ईमेल आयडी तयार केल्याबाबत व त्यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याबाबतची तक्रार घेऊन ते पोलीस ठाण्यात आले. याप्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवत ओशिवरा पो.ठाणेचे मा.व.पो. नि. धनावडे सो व पो.नि.सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी पो उ नि कुरकुटे, पोलीस अंमलदार कोंडे,सरनोबत  यांनी तात्काळ प्राप्त माहिती च्या आधारे व सोहम रॉक स्टार इंटरटेनमेंट कंपनीस प्राप्त झालेला ई-मेलची पाहणी केली असता यातील आरोपी यांनी तक्रार यांच्या कंपनीची ईमेल आयडी मध्ये बदल करून त्याच प्रमाणे दिसणारी बनावट जीमेल आयडी तयार करून तक्रारदार यांच्या कंपनीची स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे खाते बंद झाले असल्याने कॅनरा बँकेच्या वर नमूद खात्यामध्ये पैसे जमा करावे  असा ई-मेल आल्याचे दिसून आल्याने सदरचे बँक खाते डेबिट फ्रिज करण्याकरिता कॅनरा बँकेचे मॅनेजर/ नोडल अधिकारी यांचेशी संपर्क करुन व ईमेलद्वारे पत्र व्यवहार करून फिर्यादी यांची  फसवणूक झालेल्या सर्व रक्कम गोठविण्यास यश आले. सर्व तक्रारदार यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याचेही ओशिवरा पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: due to golden hour senior citizen get amount of one and a half million is back in the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.