Crime news: मागण्यांच्या त्रासाने मित्राने ‘तिला’ संपविले, तरुणीची पालघरला नेऊन केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:57 AM2022-02-05T11:57:53+5:302022-02-05T12:00:08+5:30

Crime News: सांताक्रूझमधून बेपत्ता असलेल्या पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता (२९) या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र झिको अंसलिम मिस्कित (२७) याला विलेपार्लेतून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. महागड्या भेटवस्तू, रोज फिरायला नेण्याच्या नेहमीच्या मागण्यांचा त्याच्या डोक्याला ताप झाला होता.

Due to the demands, the friend killed 'her', took the girl to the nursery and killed her | Crime news: मागण्यांच्या त्रासाने मित्राने ‘तिला’ संपविले, तरुणीची पालघरला नेऊन केली हत्या

Crime news: मागण्यांच्या त्रासाने मित्राने ‘तिला’ संपविले, तरुणीची पालघरला नेऊन केली हत्या

Next

मुंबई : सांताक्रूझमधून बेपत्ता असलेल्या पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता (२९) या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र झिको अंसलिम मिस्कित (२७) याला विलेपार्लेतून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. महागड्या भेटवस्तू, रोज फिरायला नेण्याच्या नेहमीच्या मागण्यांचा त्याच्या डोक्याला ताप झाला होता. त्या संपत नव्हत्या म्हणून कंटाळून तिलाच संपविले असे त्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ मधील अधिकाऱ्यांना सांगितले. 
पिंकी २४ डिसेंबरपासून बेपत्ता झाल्यावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली. सांताक्रूझ पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ चे अधिकारीही याचा तपास करीत होते. ज्यात पिंकीचा एक मित्र असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी झिकोला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. झिको सुरुवातीला काहीच माहिती देत नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच तिची हत्या केल्याची कबुली दिली. पिंकी त्याची जुनी मैत्रीण होती.
झिकोचे अन्य मुलीवर प्रेम असल्याने अखेर पिंकीचा त्रास कायमचा संपवायचा असे त्याने ठरविले. त्याच्या कबुलीनंतर आरोपीला अधिक तपासासाठी कक्ष ९ ने पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आहेर, नाळे, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. झिकोला मदत करणाऱ्या त्याच्या कुमार नावाच्या साथीदाराला पालघर पोलिसांनी विरारमधून अटक केली आहे.

दोघांत झाले भांडण
२४ डिसेंबरला दुचाकीवरून दोघे पालघरला फिरायला गेले. तिच्या वागण्यावरून, भेटायला बोलावण्यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि झिकोने २४ डिसेंबरच्याच रात्री पिंकीला जेट्टी परिसरात असलेल्या डोंगराळ भागात धक्का दिला. तेव्हा ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्याने त्याची दुचाकी मित्र कुमारला घेऊन जाण्यास सांगत अन्य मित्रांसोबत ट्रिपल सीट परतला.

Web Title: Due to the demands, the friend killed 'her', took the girl to the nursery and killed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.