चेन विक्रीसाठी आलेल्या दुकलीला कळवा पोलिसांनी पकडले, ठाणे रेल्वे स्थानकावर चोरीची कबुली

By अजित मांडके | Published: April 6, 2024 03:27 PM2024-04-06T15:27:06+5:302024-04-06T15:27:25+5:30

राजेश शंकर पवार (३२) आणि सुनील शिवाजी जाधव (३०) अशी दोघांची नावे

Dukli, who came to sell chains, was nabbed by Kalwa police, confessed to theft at Thane railway station | चेन विक्रीसाठी आलेल्या दुकलीला कळवा पोलिसांनी पकडले, ठाणे रेल्वे स्थानकावर चोरीची कबुली

चेन विक्रीसाठी आलेल्या दुकलीला कळवा पोलिसांनी पकडले, ठाणे रेल्वे स्थानकावर चोरीची कबुली

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एक्सप्रेसमधून प्रवासी महिलेच्या गळ्यातून चैन चोरणाऱ्या राजेश शंकर पवार (३२) आणि सुनील शिवाजी जाधव (३०) या दुकलीला कळवा पोलिसांनी अटक करत, त्यांच्याकडून चोरलेली चैन हस्तगत करण्यात यश आले. हे दोघे नवी मुंबई परिसरात होणाऱ्या असून त्यांनी ही चोरी ठाणे रेल्वे स्टेशन वरील फलाट क्रमांक ६ वरून जाणाऱ्या अमरावती एक्स्प्रेसच्या महिला डब्ब्यात केल्याची कबुली दिल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले. तसेच त्यांना हटकल्यावर त्यांनी धूम ठोकली होती. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. यापूर्वी कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात अशाच प्रकारची जबरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कळवा मार्केट परिसरात सोन्याची चैन विक्रीसाठी एक दुकली येणार असल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकाने त्यांना ४ एप्रिल २०२४ रोजी हटकले. त्यावेळी त्यांनी तेथून पळ काढला खरा पण, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत, त्यांना वेळीच पकडले. त्यांची झडती घेतल्यावर राजेश पवार यांच्याकडे तुटलेली चैन मिळून आली. तर राजेश याने ती सोन्याची चैन ही ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅट फॉर्म नबर-६ वर आलेल्या अमरावती एक्सप्रेस मधील एका डब्यातील महिला प्रवाशाचे गळयातुन जबरीने खेचलेली असल्याची कबुली दिली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असल्याने मुद्देमालासह चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.

Web Title: Dukli, who came to sell chains, was nabbed by Kalwa police, confessed to theft at Thane railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.