पत्नीचा प्रियकरावर जडला जीव, पती ठरला अडसर, पत्निने उचलले भयंकर टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:45 PM2022-12-21T20:45:39+5:302022-12-21T20:45:46+5:30
राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात पत्नीने प्रियकरासह आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात पत्नीने प्रियकरासह आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत होता, त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतिची हत्या केली. पतीचा मृतदेह त्यांच्याच घराच्या अंगणात पडलेला आढळून आला. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी हत्येचा आरोप असलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. ही हत्या प्रकरण डुंगरपूर जिल्ह्यातील सीमालवाडा भागातील आहे.
तुरुंगातून बाहेर येणार 'बिकिनी किलर' चार्ल्स शोभराज, 19 वर्षापासून नेपाळच्या तुरुंगात कैद
सीमलवाडा पोलीस उपअधीक्षक रामेश्वर लाल यांनी सांगितले की, 18 डिसेंबर रोजी धुंदी गावात राहणारा देवा कटारा याने यासंदर्भात अहवाल दिला होता. रिपोर्टमध्ये देवा कटारा यांनी सांगितले होते की, १५ डिसेंबर रोजी त्यांचा मुलगा भुरा कटारा (४५) याचे पत्नी कंकूसोबत फोनवर बोलण्यावरून भांडण झाले. भांडण झाल्यानंतर भुरा यांची पत्नी घरातून निघून गेली होती. १७ डिसेंबरच्या रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते.
भुरा घराच्या अंगणात झोपला होता. सकाळी सर्वजण उठले असता त्यांना पतिचा मृतदेह अंगणात संशयास्पद अवस्थेत पडलेला दिसला. भुराच्या तोंडातून रक्त येत होते. त्याच्या मानेवर दोरीच्या खुणा होत्या. यावरून नातेवाइकांनी कुआ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. यादरम्यान मृताच्या वडिलांनी आपली सूनेवर कोणाच्या तरी संगनमताने आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला.
देवा कटारा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृताच्या पत्नीचा शोध सुरू करण्यात आला. यादरम्यान गुजरातमधील कडाणा जंगलाजवळ पत्नीला एका तरुणासोबत दिसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी कडाणा येथील जंगलात छापा टाकला. पोलिसांनी सरणखास येथील रहिवासी महिलेला आणि शंकर डामोर यांना ताब्यात घेऊन कुआ पोलीस ठाण्यात आले.
पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी भुरा कटारा यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली.